अशोक अडसूळ, लोकसत्ता

मुंबई : राष्ट्रीय समाज पक्षाचे (‘रासप’) संस्थापक- अध्यक्ष महादेव जानकर यांच्या कुटुंबात दुफळी निर्माण झाली आहे. माढा मतदारसंघात यावेळी विजय टप्प्यात असतानासुद्धा महायुतीकडून परभणी मतदारसंघातून महादेव जानकर यांनी उमेदवारी जाहीर केली आहे. त्यावरुन जानकर कुटुंबात मतभेद झाले असून काकांचा निर्णय न पटल्याने त्यांचा पुतण्या स्वरुप जानकर यांनी माढामधून लोकसभा लढवण्याचा निर्णय घेतला आहे. काका महादेव जानकर हे महायुतीचे पाठीराखे असताना पुतण्याने मात्र ‘भाजपमुक्त माढा’चा नारा दिला आहे.

Congress should openly come forward and say that a farmers son should not become an MP says chandrahar patil
उमेदवारी मागे घेण्यास तयार, पण… – चंद्रहार पाटील
What Poonam Mahajan Said?
भाजपाने तिकिट कापल्यानंतर पूनम महाजन यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या, “मी…”
Uddhav Thackrey Kundli Shine In Loksabha Elections Till 2027
“उद्धव ठाकरेंच्या पत्रिकेतच पुरावा, लोकसभेत शिवसेनेला..”, ज्योतिषांची मोठी भविष्यवाणी
MLA chandrakanat Patil is upset as Eknath Khadse will return to BJP
खडसे भाजपमध्ये परतणार असल्याने आमदार पाटील अस्वस्थ

हेही वाचा >>> तोट्यात असणाऱ्या ३३ कंपन्यांकडून ५४२ कोटी रुपयांचे रोखे दान, एकट्या भाजपाला मिळाले तब्बल…

महादेव जानकर यावेळी ‘माढा’मधून ‘महाविकास आघाडी’कडून (‘मविआ’) लढणार होते. मात्र भाजपच्या दबावापुढे झुकत त्यांनी महायुतीची परभणीची उमेदवारी स्वीकारली. जानकर कुटुंब सातारा जिल्ह्यातील माण भागातले आहे.पळसावडे हे त्यांचे गाव माढा लोकसभा मतदारसंघात येते. २००९ मध्ये त्यांनी माढा मधून तर २०१४ मध्ये बारामतीमधून लोकसभा लढवली होती. माढामध्ये मोठ्या प्रमाणात जानकर यांच्या धनगर जातीचे मतदार आहेत.

हेही वाचा >>> काँग्रेसला ‘ठोसा’ देत ऑलिम्पिक पदकविजेत्या बॉक्सरचा भाजपाच्या तिकीटावर निवडणुकीच्या ‘रिंग’मध्ये प्रवेश; कारण काय?

काकाचा निर्णय चुकीचा आहे, असे जाहीर करत पुतण्या स्वरुप जानकर यांनी ‘माढा’मधून लोकसभा निवडणूक लढण्याचा निर्णय जाहीर केले आहे. मात्र त्यांचा पक्ष ठरलेला नाही. १४ एप्रिलरोजी ते कोणत्या पक्षाकडून लढणार हे जाहीर करणार आहेत. काका महादेव जानकर हे त्यांना माढामधून उमेदवारी देऊ शकत नाहीत. महाविकास आघाडीचा उमेदवार निश्चित झालेला नाही. महायुतीचे रणजितसिंह नाईक निंबाळकर येथून उमेदवार आहेत.‘वंचित’ने येथून उमेदवार जाहीर केलेला आहे. . काका -पुतण्याचा वाद महाराष्ट्राला नवा नाही. प्रस्थापित राजकीय घराण्यात काका -पुतण्यांचे वाद चव्हाट्यावर आलेले असताना चिमुकल्या ‘रासप’च्या जानकर कुटुंबातही लोकसभा निवडणुकीत वादाचे लोण आले आहे.