देशातील सर्वच राष्ट्रीय आणि प्रादेशिक पक्षांना २०२४ साली होणाऱ्या लोकसभा निवडणुकीचे वेध लागले आहे. उत्तर प्रदेशमध्ये चांगली कामगिरी करण्यासाठी भाजपासह सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. समाजवादी या प्रादेशिक पक्षानेदेखील आतापासूनच तयारी सुरू केली आहे. त्यासाठी समाजवादी पक्षाचे सर्वेसर्वा अखिलेश यादव कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांसोबत बैठका घेत आहेत.

समाजवादी पार्टी सक्रिय, लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू

पक्षाचा संदेश कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचावा यासाठी समाजवादी पक्षाने अलिकडेच लखीमपूर आणि सितापूर येथे शिबिरे आयोजित केली होती. या शिबिरांना अखिलेश यादव यांनी हजेरी लावली होती. अखिलेश यांच्यासह पक्षाच्या अन्य महत्त्वाच्या नेत्यांनी यावेळी कार्यकर्त्यांना संबोधित केले होते. मागील काही दिवसांपासून समाजवादी पक्ष चांगलाच सक्रिय झाल्याचे दिसत आहे. अलिकडेच अखिलेश यादव यांनी सीतापूर जिल्ह्यातील प्रमुख हिंदूधर्माचे तीर्थक्षेत्र असलेल्या नैमिषारण्य येथे आरती केली. तसेच यावेळी भाजपावर टीका केली.

Ambedkarist activists active in support of Mavia Discuss the danger of changing the constitution
‘मविआ’च्या समर्थनार्थ आंबेडकरवादी कार्यकर्ते सक्रिय; राज्यघटना बदलली जाण्याच्या धोक्याची चर्चा
congress in gujarat loksabha
गुजरातमधील काँग्रेसचे ‘जायंट-किलर’ रूपालांविरोधात निवडणुकीच्या रिंगणात; भाजपाचं गणित बिघडणार?
Prime Minister criticism of the campaign rally in Rajasthan to stop the action of corrupt people
भ्रष्ट लोकांची कारवाई थांबवण्यासाठी एकजूट; राजस्थानमधील प्रचारसभेत पंतप्रधानांची टीका
शरद पवारांच्या आगमनापूर्वीच वर्धेत मानापमान नाट्य; काँग्रेस नेत्यांना व्यासपीठावर स्थान नाही

अखिलेश यादव यांचे सूचक विधान

अखिलेश यादव हिंदुत्वाचा मार्ग स्वीकारत आहेत, असा दावा भाजपाकडून केला जात आहे. असे असतानाच “आता हळवे होऊन चालणार नाही. यावेळी कठोर व्हावे लागणार आहे,” असे सूचक विधान अखिलेश यादव यांनी केले आहे. समाजवादी पक्षाचे सचिव शिवपालसिंह यादव यांनी इटावा जिल्ह्यातील जसवंत नगर या त्यांच्या मतदारसंघात रामाच्या कांस्य मूर्तीचे अनावरण केले. शिवपाल यांनी जसवंतनगर येथे पालिकेने स्थापन केलेल्या मूर्तीचीही पूजा केली. आतापर्यंत समाजवादी पक्षाच्या नेत्यांनी अयोध्येत निर्माणाधीन असलेल्या राम मंदिराला भेट देण्यास टाळले आहे. मात्र यापुढे या पक्षाचे नेते अयोध्येत जाऊ शकतात, तसा अंदाज व्यक्त केला जात आहे.

प्रत्येक मतदारसंघात शिबिराचे आयोजन केले जाणार

लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून समाजवादी पक्षाकडून उत्तर प्रदेशच्या ८० लोकसभा मतदारसंघात शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे. या शिबिरांमध्ये पक्षाचे नेते कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. २०२२ सालच्या विधानसभा निवडणुकीदरम्यान अखिलेश यादव यांनी ‘समाजवादी विजय यात्रे’चे आयोजन केले होते. या यात्रेचा त्यांच्या पक्षाला फायदा झाला होता. त्यानंतर आता अखिलेश यादव यांनी उत्तर प्रदेशमध्ये ‘लोक जागरण यात्रा’ आयोजित केली आहे. लखीमपूर येथून या यात्रेची सुरुवात झाली आहे. यात्रेदरम्यान ओबीसी मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करण्यात येतोय.

मतदारसंघाची माहिती गोळा करण्यास सुरुवात

समाजवादी पार्टीच्या लखनौ येथील मुख्यालयात नुकतेच पक्षाच्या कार्यकर्त्यांची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत अखिलेश यादव यांनी गट न पाडता एकतेने स्वत:ला झोकून तसेच प्रामाणिकपणे काम करा, असे आवाहन आपल्या कार्यकर्त्यांना केले आहे. लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने अखिलेश यादव यांनी सर्वच लोकसभा मतदारसंघांची माहिती गोळा करण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये विरोधी पक्षातील खासदारांच्या मतदारसंघांवर विशेष लक्ष देण्यात येत आहे. या मतदारसंघांमध्ये पक्षाची ताकद किती आहे. पक्ष कोठे बळकट आहे, याबाबतची माहिती जिल्हा प्रमुखांकडून मागवण्यात येत आहे.

सक्रिय पदावर नसलेल्या कार्यकर्त्यांना पदावरून केले दूर

अखिलेश यादव प्रत्येक मतदासंघाकडे कटाक्षाने लक्ष देत आहेत. त्यासाठी ते जिल्हापातळीवरील नेत्यांसोबत बैठक घेत आहेत. पहिल्यांदाच समाजवादी पक्षाकडून प्रत्येक मतदारसंघासाठी पूर्णवेळ प्रभारी देण्यात आला आहे. सक्रिय नसेलेल्या कार्यकर्त्यांना बाजूला सारून नवे ‘झोनल युनिट्स’ तयार करण्यात आले आहेत.

२०१९ च्या निवडणुकीत मतदारांची नावे वगळली?

“याआधीच्या निवडणुकीत तसेच पोटनिवडणुकीत समाजवादी पक्षाची हार झाली. या निवडणुकांत समाजवादी पक्षाचे समर्थन करणाऱ्या मतदारांची नावे मतदार यादीतून वगळण्यात आली. भाजपाकडून सत्तेचा गैरवापर करण्यात आला. त्यामुळे प्रत्येक मतदारसंघाचे प्रभारी यावेळी मतदार यादीवर लक्ष ठेवणार आहेत. सर्व पात्र मतदारांचे नाव मतदार यादीमध्ये असावेत, यासाठी आमच्याकडून प्रयत्न करण्यात येणार आहे,” असे पक्षाच्या एका नेत्याने सांगितले आहे.

२०१९ च्या निवडणुकीत अवघ्या ५ जागांवर विजय

दरम्यान, २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत समाजवादी पक्षाने बहूजन समाज पार्टी तसेच राष्ट्रीय लोक दल या पक्षांशी युती केली होती. या निवडणुकीत बहूजन समाज पार्टीचा १० जागांवर विजय झाला होता. तर समाजवादी पार्टीला फक्त ५ जागांवर विजय मिळाला होता. रामपूर आणि आझमगड या लोकसभा मतदारसंघांच्या पोटनिवडणुकीत पराभव झाल्यामुळे सध्या समाजवादी पार्टीचे फक्त तीन खासदर आहेत.