Premium

औसा मतदारसंघात नव्या दमाने पुन्हा दिनकर माने मैदानात

औसा विधानसभा मतदारसंघ हा भाजपा शिवसेना युतीमध्ये शिवसेनेकडे होता दिनकर माने यांनी औसा विधानसभा मतदारसंघातून दोन वेळा विजयप्राप्त केला होता.

dinkar mane, Ausa assembly constituency, latur
औसा मतदारसंघात नव्या दमाने पुन्हा दिनकर माने मैदानात

प्रदीप नणंदकर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

लातूर जिल्ह्यातील औसा विधानसभा मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाचे माजी आमदार दिनकर माने यांनी विधानसभा निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केल्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांत चलबिचल सुरु झाली आहे.

औसा विधानसभा मतदारसंघ हा भाजपा शिवसेना युतीमध्ये शिवसेनेकडे होता दिनकर माने यांनी औसा विधानसभा मतदारसंघातून दोन वेळा विजयप्राप्त केला होता. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे तत्कालीन स्वीय सहाय्यक अभिमन्यू पवार यांनी औसा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचे ठरवले व युतीमध्ये औसा विधानसभा मतदारसंघ भाजपकडे सोडण्यात आला त्यामुळे दिनकर माने यांना आपला दावा सोडावा लागला .निवडणुकीच्या प्रचारात अभिमन्यू पवार यांच्यासोबत दिनकर मानेही होते. दोन वेळा औसा विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करून व राज्यमंत्रीपद असतानाही बसवराज पाटील मुरूमकर यांना दारुण पराभव पत्करावा लागला होता .अर्थात त्याची वेगवेगळी कारणे आहेत ,काँग्रेस अंतर्गत लाथाळी, मराठा लिंगायत वाद असे अनेक कारणे आहेत.

हेही वाचा… नगरमध्ये छावणी परिषदेच्या महापालिका हद्दीतील समावेशाची ‘राजकीय लगीन घाई’

२०२४ च्या विधानसभा निवडणुकीसाठी बसवराज पाटील मुरूमकर तयारी करत नसल्याचे सध्याचे चित्र आहे. महाआघाडी कडून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट व शिवसेना उद्धव ठाकरे गट यांची आघाडी असल्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे लातूर जिल्ह्याचे जिल्हाप्रमुख दिनकर माने यांनी विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे यामुळे पारंपारिक निवडणूक न होता भाजपा व शिवसेना अशीच आमने-सामने लढाई होईल असे चित्र आहे. अर्थात काँग्रेसने या मतदारसंघातून दोन वेळा प्रतिनिधित्व केल्यामुळे सहजासहजी काँग्रेस आपला मतदार संघावरील दावा सोडेल असे वाटत नाही.

हेही वाचा… मालेगावात ठाकरे-शिंदे गटातील लढाई वेगळ्या वळणावर

अभिमन्यू पवार हे नव्या दमाचे आमदार आहेत त्यांनी आपल्या मतदारसंघात शासनाच्या विविध योजना आणल्या प्रत्येक गावात त्यांचा वैयक्तिक संपर्क आहे आयुष्याच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न असेल शेत रस्त्याचे प्रश्न असतील असे मतदारसंघाचे अनेक प्रश्न त्यांनी सोडवले आहेत या उलट दिनकर माने हे वापरलेले नाणे आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Uddhav thackeray supporters dinkar mane going contest election from ausa assembly constituency print politics news asj

First published on: 07-12-2023 at 14:35 IST
Next Story
नगरमध्ये छावणी परिषदेच्या महापालिका हद्दीतील समावेशाची ‘राजकीय लगीन घाई’