पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा वाराणसी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवीत आहेत. त्यांच्याविरोधात सहा उमेदवार रिंगणात आहेत. त्यामध्ये काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अजय राय यांचाही समावेश आहे. २०१४ मध्ये पहिल्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वाराणसीमधून निवडणूक लढवली तेव्हा त्यांच्याविरोधात आम आदमी पार्टीचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांचे आव्हान होते. पंतप्रधान मोदींनी ५६.३७ टक्के मते मिळवीत ३.७२ लाख मतांनी विजय प्राप्त केला. २०१९ मध्ये पुन्हा पंतप्रधान मोदींनी विजय प्राप्त करून दुसऱ्यांदा सत्ता मिळवली. या निवडणुकीमध्ये ६३.६ टक्के मते मिळवीत ते ४.५९ लाख मताधिक्याने विजयी झाले. या निवडणुकीमध्ये समाजवादी पार्टीच्या शालिनी यादव यांचे प्रमुख आव्हान मोदींसमोर होते.

२०१४ मध्ये पंतप्रधान मोदींविरोधात तब्बल ४१ उमेदवार रिंगणात होते. त्यातील १९ उमेदवार अपक्ष होते. २०१९ मध्ये २६ उमेदवार रिंगणात होते. त्यातील आठ उमेदवार अपक्ष होते. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये एकूण ४१ उमेदवारांनी नामांकन अर्ज भरले होते. त्यापैकी एकाने आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. सरतेशेवटी ४१ पैकी फक्त सात जणांचेच अर्ज वैध ठरले. वाराणसीमध्ये शेवटच्या टप्प्यात म्हणजेच १ जून रोजी मतदान पार पडणार आहे. त्यानंतर ४ जूनला लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर केला जाईल.

yogendra yadav
“लोकसभेच्या निकालानंतर अजित पवार आणि एकनाथ शिंदे…”, योगेंद्र यादव यांचं मोठं विधान!
Raghuram Rajan reuters
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाला तर…”, भारताच्या अर्थव्यवस्थेबाबत माजी RBI गव्हर्नर रघुराम राजन यांचं मोठं वक्तव्य
What Kangana Said?
कंगनाचा धक्कादायक दावा, “कोणतीही नवी हिरोईन आली की तिला दाऊदसमोर..”
Maharashtra Lok Sabha Election Result 2024 Updates in Marathi
Maharashtra Lok Sabha Election Result 2024: महाराष्ट्रातील ४८ मतदारसंघात काय आहे स्थिती? कुणाला मिळाला विजय; कोण आघाडीवर? जाणून घ्या…
abhijt panse mns candidate
भारतीय जनता पक्षाच्या जागेवर मनसेने केला उमेदवार जाहीर, आता भाजपाच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष!
navneet rana uddhav thackeray
“मी पराभूत झालेय, उद्धव ठाकरेंनी आता तरी…”, नवनीत राणांचं वक्तव्य चर्चेत
narendra modi statement on mahatma gandhi
“गांधींना कोणी ओळखत नव्हतं, चित्रपट बनला तेव्हा त्यांना जगभरात ओळख मिळाली”; पंतप्रधान नरेंद्र मोदींचं विधान चर्चेत!
BJP MP R P N Singh interview
“‘४०० पार’ ही भाजपाची घोषणा नाहीच,” भाजपा खासदार आरपीएन सिंह असे का म्हणाले?

१९९१ पासून भाजपाने सात वेळा या मतदारसंघामधून विजय मिळविला आहे. फक्त २००४ मध्ये काँग्रेसच्या राजेश कुमार मिश्रा यांचा विजय झाला होता. २००९ मध्ये भाजपाचे ज्येष्ठ नेते मुरली मनोहर जोशी वाराणसी मतदारसंघाचे खासदार होते. वाराणसी मतदारसंघामध्ये, बहुसंख्य मतदार हे उच्च जातीचे हिंदू आहेत. त्यामध्ये ब्राह्मण, भूमिहार व जैस्वाल समाजाचे लोक आहेत. त्यानंतर मुस्लीम आणि ओबीसींची लोकसंख्या अधिक आहे. पंतप्रधान मोदींविरोधात निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या उमेदवारांवर एक नजर…

हेही वाचा : “‘४०० पार’ ही भाजपाची घोषणा नाहीच,” भाजपा खासदार आरपीएन सिंह असे का म्हणाले?

अजय राय (५३), काँग्रेस

जंगम मालमत्ता : ६.६६ लाख रुपये; पत्नीची जंगम मालमत्ता : ४५.३७ लाख रुपये
स्थावर मालमत्ता : १.२५ कोटी रुपये, पत्नीची स्थावर मालमत्ता : ८० लाख रुपये
दाखल खटल्यांची संख्या : १८

अजय राय काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष असून, राज्यातील जुने नेते आहेत. वाराणसी लोकसभा मतदारसंघातून लढविलेल्या २००९, २०१४ व २०१९ च्या तीनही निवडणुकांत त्यांचा मोठ्या फरकाने पराभव झाला आहे. मात्र, गेल्या तीन निवडणुकांमध्ये ते मोदींसमोरील मोठे आव्हान ठरले आहेत. त्यांनी २०१४ व २०१९ ची निवडणूक काँग्रेसच्या तिकिटावर; तर २००९ ची निवडणूक समाजवादी पार्टीच्या तिकिटावर लढवली होती. प्रत्येक निवडणुकीत ते तिसऱ्या स्थानावर राहिले आहेत.

अजय राय (५३) पाच वेळा आमदारही राहिले आहेत. चार वेळा कोलास्ला विधानसभा मतदारसंघातून, तर एक वेळ ते पिंडारामधून आमदार राहिले आहेत. विशेष म्हणजे कोलास्ला मतदारसंघातून ते तीन वेळा भाजपाच्या तिकिटावरच आमदार झाले होते; तर एकदा ते अपक्ष म्हणून निवडून आले होते. २०१२ ते २०१७ दरम्यान ते काँग्रेसच्या तिकिटावर पिंडारा विधानसभा मतदारसंघाचे आमदार होते. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये काँग्रेसने अजय राय यांची उत्तर प्रदेशच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड केली आहे.

अतहर जमाल लारी (७०), बहुजन समाज पार्टी

जंगम मालमत्ता : ६.५२ लाख रुपये; पत्नीची जंगम मालमत्ता : ३.३१ लाख रुपये
स्थावर मालमत्ता : १.८ कोटी रुपये; पत्नीची स्थावर मालमत्ता : नाही.
दाखल खटल्यांची संख्या : १

अतहर जमाल लारी हे वाराणसीचे रहिवासी असून यंत्रमाग कारखान्याचे मालक आहेत. ते १९६० पासून समाजवादी राजकारणाशी निगडित आहेत. त्यांनी वाराणसीमधून अनेक वेळा निवडणूक लढवली असून, त्यांना एकदाही विजय मिळविता आलेला नाही. १९७१ मध्ये ते विद्यार्थी नेता होते. आणीबाणीच्या काळात ते भूमिगतही झाले होते. ‘दी इंडियन एक्स्प्रेस’शी बोलताना ते म्हणाले, “१९७७ मध्ये त्यांनी जनता पार्टीमध्ये प्रवेश केला होता आणि पक्षाचे अधिकृत पदही घेतले होते.”

१९८४ मध्ये लारी यांनी पहिल्यांदा वाराणसी लोकसभा मतदारसंघातून जनता पार्टीच्या तिकिटावर निवडणूक लढवली आणि ते पराभूत झाले. त्यानंतर १९९१ मध्ये त्यांनी वाराणसी कांट विधानसभा मतदारसंघातून जनता दलाकडून निवडणूक लढवली. भाजपाच्या ज्योत्स्ना श्रीवास्तव यांनी त्यांचा पाच हजार मतांनी पराभव केला होता. जनता दलामध्ये फूट पडल्यानंतर लारी यांनी १९९५ साली अपना दल पक्षामध्ये प्रवेश केला. त्यांना पक्षाचे प्रदेशाध्यक्षपद देण्यात आले.

२००४ मध्ये लारी यांनी अपना दलाकडून वाराणसी लोकसभेची निवडणूक लढवली. त्यांना १४.७३ टक्के मते मिळाली. २०२२ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये लारी यांनी समाजवादी पार्टीला समर्थन दिले. त्यानंतर त्यांनी बसपामध्ये प्रवेश केला. आता ते बसपाच्या तिकिटावर नरेंद्र मोदींना आव्हान देत आहेत.

कोलिसेट्टी शिव कुमार (४६), युग तुलसी पार्टी

जंगम मालमत्ता : ३६.१९ लाख रुपये; पत्नीची जंगम मालमत्ता : ४५.९० लाख रुपये
स्थावर मालमत्ता : २.०२ कोटी रुपये, पत्नीची स्थावर मालमत्ता : १.९७ कोटी रुपये
दाखल खटल्यांची संख्या : ०

हैदराबादचे रहिवासी असणारे शिव कुमार हे तिरुमला तिरुपती देवस्थानमच्या मंडळावरील (आंध्र प्रदेशातील तिरुमला व्यंकटेश्वर मंदिरासह इतर मंदिरांचे व्यवस्थापन करणारे ट्रस्ट) सदस्य आहेत. ‘दी इंडियन एक्स्प्रेस’शी बोलताना ते म्हणाले, त्यांनी आयुष्यभर गोरक्षणासाठी काम केले आहे. हैदराबादमध्ये त्यांच्या तीन गोशाळा असून, त्यांनी १५०० गाईंना आश्रय दिला आहे.

केंद्र सरकारने गाईला राष्ट्रीय प्राणी घोषित करावे, अशी शिव कुमार यांची मागणी आहे. त्यासाठी ते वाराणसी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवीत आहेत. “भारतीय जनता पार्टी सनातन धर्माविषयी बोलतो. मात्र, ते सनातन धर्माच्या संवर्धनासाठी काहीही करत नाहीत.” असेही ते म्हणाले. “मी उमेदवारी मागे घ्यावी यासाठी भाजपाकडून माझ्यावर दबाव टाकण्यात आला. तसेच माझा अर्ज बाद ठरविण्यासाठी स्वत: निवडणूक आयोगही प्रयत्न करीत होता. माझ्याविरोधात एक खोटा गुन्हाही दाखल करण्यात आला. अटक करण्याच्या भीतीमुळे मला प्रचार करता आला नाही,” असाही आरोप त्यांनी केला.

वाराणसीतील भेलुपूर पोलिस ठाण्यामधील एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले, “शिव कुमार यांच्यावर फसवणूक, घोटाळा व गुन्हेगारी धमकी अशा आरोपांखाली भारतीय दंड संहितेच्या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कुमार यांनी कोणतीही कल्पना न देता गोरक्षणाच्या नावाखाली सह्या घेऊन, मंजू देवी यांना नामनिर्देशनपत्रात प्रस्तावक केले होते. त्यामुळे मंजू देवी यांनी त्यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. याबाबत अधिक तपास सुरू आहे.” शिव कुमार यांच्या युग तुलसी पार्टीचे चिन्ह हे भारत राष्ट्र समितीच्या चिन्हाशी साधर्म्य साधणारे आहे. त्याविरोधात भारत राष्ट्र समितीने तक्रार दाखल केली होती. त्यानंतर शिव कुमार चर्चेत आले होते.

गगन प्रकाश यादव (३९), अपना दल (कमेरावादी)

जंगम मालमत्ता : १९.१६ लाख रुपये, पत्नीची मालमत्ता : १४.२५ लाख रुपये
स्थावर मालमत्ता : ६६ लाख रुपये ; पत्नीची स्थावर मालमत्ता : १० लाख रुपये
दाखल खटल्यांची संख्या : ५

आमदार पल्लवी पटेल यांच्या नेतृत्वाखालील अपना दलाकडून गगन प्रकाश यादव वाराणसीतून निवडणूक लढवीत आहेत. याआधी ते समाजवादी पार्टीमध्ये होते. मात्र, सपामध्ये दलित, मागास व अल्पसंख्याक समाजाला न्याय मिळत नसल्याचा दावा करीत त्यांनी पक्षाला राम राम केला. अपना दलाचे दोन गट आहेत. पल्लवी पटेल यांची बहिण अनुप्रिया यांचा गट एनडीएमध्ये भाजपाबरोबर सामील आहे. काही दिवसांपूर्वी एका अपघातात यादव यांनी आपला भाऊ गमावल्याने त्यांची प्रचार मोहीम ठप्प झाली आहे. वाराणसीचे अपना दलाचे (कमेरावादी) जिल्हा प्रमुख दिलीप सिंग पटेल म्हणाले, “त्यानंतर आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचू शकलेलो नाही.”

दिनेश कुमार यादव (३९), अपक्ष

जंगम मालमत्ता : १६.४० लाख, पत्नीची जंगम मालमत्ता : ०
स्थावर मालमत्ता : १० लाख रुपये; पत्नीची स्थावर मालमत्ता : ०
दाखल खटल्यांची संख्या : ०

दिनेश कुमार हे वाराणसीच्या सिकरौलचे तीन वेळा नगरसेवक राहिले आहेत. ते १५ वर्षांपासून राजकारणात सक्रिय आहेत. ‘दी इंडियन एक्स्प्रेस’शी बोलताना ते म्हणाले की, वाराणसीतून उमेदवारी दाखल करेपर्यंत ते भाजपाबरोबरच होते. त्यांनी देशाच्या लोकशाही तत्त्वांनुसार निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला असल्याचे म्हणाले. “देशात लोकशाही आहे म्हणून मी लढत आहे,” असेही यादव म्हणाले.
भाजपाचे स्थानिक नेते नवरतन राठी यांना दिनेश कुमार यांच्याबद्दल विचारले असता, या नावाचा कोणतीही व्यक्ती वाराणसी भाजपामध्ये असल्याचे आपण आजवर ऐकले नसल्याचे ते म्हणाले.

हेही वाचा : इंदिरा गांधींच्या मारेकऱ्याचा मुलगा निवडणुकीतील प्रचारामुळे चर्चेत; कारण काय?

संजय कुमार तिवारी (४९), अपक्ष

जंगम मालमत्ता : ११.४६ लाख, पत्नीची जंगम मालमत्ता : ०
स्थावर मालमत्ता : २९ लाख रुपये; पत्नीची स्थावर मालमत्ता : ०
दाखल खटल्यांची संख्या : ०

नवी दिल्लीतील सामाजिक कार्यकर्ते संजय कुमार तिवारी यांनी दावा केला की ते कामगारांच्या कल्याणासाठी काम करणाऱ्या चळवळींमध्ये सहभागी असतात. ते पुढे म्हणाले, “मी कोणत्याही राजकीय पक्षाशी थेट संबंधित नाही.”

निवडणूक लढविण्याच्या निर्णयावर तिवारी म्हणाले, “मी गांधीवादी तत्त्वज्ञानाचे पालन करतो. मी पंतप्रधान मोदींचा टीकाकार असल्याने त्यांच्याविरोधात वाराणसीतून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला.”