भारतीय कम्युनिस्ट पक्षाने (CPI) सोमवारी ॲनी राजा यांना केरळमधील वायनाड लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवार म्हणून घोषित केले. सध्या या मतदारसंघात काँग्रेसचे राहुल गांधी खासदार आहेत. ॲनी या सीपीआयच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या सदस्य असून, त्या पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत. खरं तर पक्षाचे सरचिटणीस डी राजा यांच्या त्या पत्नी आहेत. त्या नॅशनल फेडरेशन ऑफ इंडियन वुमनच्या सरचिटणीसही आहेत आणि शालेय जीवनापासून त्या राजकारणात आहेत. पश्चिम बंगाल आणि पंजाबनंतर आता केरळमध्येही विरोधी I.N.D.I.A. आघाडीमध्ये फूट पडली आहे. इंडिया आघाडीचा प्रमुख मित्र कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाने (सीपीआय) सोमवारी ४ जागांसाठी आपले उमेदवार जाहीर केले. यातील राहुल गांधी यांच्या वायनाड लोकसभा मतदारसंघातून पक्षाने ॲनी राजा यांना तिकीट दिले आहे. याशिवाय तिरुअनंतपुरमचे काँग्रेस खासदार शशी थरूर यांच्या विरोधात पनियान रवींद्रन यांना तिकीट देण्यात आले आहे. तर व्हीएस सुनील कुमार यांना त्रिशूरमधून आणि अरुण कुमार यांना मावेलिकारामधून उमेदवारी देण्यात आली आहे. ॲनी राजा यांना उमेदवारी दिल्यानंतर त्यांनी इंडियन एक्सप्रेसला मुलाखत दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राजकारणात अनेक दशकांनंतर तुम्ही निवडणुकीत पदार्पण करताय; कसे वाटतेय?

गेल्या ४०-४५ वर्षांत पक्षाने मला अनेक संघटनात्मक जबाबदाऱ्या दिल्या आहेत. मी महिलांमध्येही काम करीत आहे, त्यांना एकत्र करून त्यांच्या समस्या मांडत आहे. आता पक्षाने माझ्यावर नवी जबाबदारी दिली आहे. सीपीआय आणि सीपीआय(M) हे इंडिया आघाडीचा भाग आहेत.

हेही वाचाः पिंपरी-चिंचवडमध्ये वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी राष्ट्रवादीचे दोन्ही गट आक्रमक

आता तुमचा सामना वायनाडमध्ये इंडिया आघाडीतील राहुल गांधींशी होणार आहे?

केरळमध्ये गेली अनेक वर्षे डावे लोकशाही आघाडी (LDF) विरुद्ध युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंट (UDF) अशी लढत राहिली आहे. २०१९ मध्येही सीपीआयने वायनाडची जागा लढवली होती. एलडीएफ आघाडीत सीपीआयला चार जागा देण्यात आल्या असून, वायनाड ही त्यापैकी एक आहे. इतर जागा तिरुअनंतपुरम, त्रिशूर आणि मावेलिक्कारा आहेत. सीपीआयने गेल्या वेळीही या सर्व जागा लढवल्या होत्या. केरळमध्ये LDF विरुद्ध UDF अशी लढत असून, राज्यात कोणतीही इंडिया आघाडी नाही. जेव्हा इंडिया आघाडीतील पक्षांच्या बैठका झाल्या, तेव्हा त्यांनी स्वतःच आपली भूमिका स्पष्ट केली होती. तसेच डावे आणि धर्मनिरपेक्ष, लोकशाहीवादी पक्षांनी एकत्र आले पाहिजे, असं मत त्यांनी मांडलं होतं. त्यावेळीही केरळ अपवाद ठरला होता.

हेही वाचाः शिंदे गटाची १८ जागांची मागणी भाजप मान्य करणार का ?

तुमचा सामना काँग्रेसचे विद्यमान खासदार राहुल गांधी यांच्या विरोधात असेल का?

मला वाटते सद्बुद्धीचा विजय होणार आहे. आम्ही उमेदवार जाहीर केल्यापासून केरळमधून निवडणूक लढवून काँग्रेस किंवा राहुल गांधींना काय फायदा? राष्ट्रीय पातळीवर काँग्रेस आणि डावे पक्ष आरएसएस आणि भाजपासारख्या फॅसिस्ट शक्तींविरुद्ध लढत आहेत . त्यामुळे काँग्रेसकडे आपल्या नेतृत्वासाठी सुरक्षित जागेसाठी अनेक पर्याय आहेत. जर ते खरोखरच या फॅसिस्ट शक्तींविरुद्ध प्रामाणिकपणे लढा देत असतील तर त्यांना विचार करावा लागेल. तो त्यांचा विशेषाधिकार आहे. जेव्हा तुम्ही सीपीआयला प्रश्न विचारता तेव्हा लक्षात ठेवा मागच्या वेळीही सीपीआयने निवडणूक लढवली होती. काँग्रेसकडे अनेक पर्याय आहेत. आम्ही शेकडो जागांवर निवडणूक लढवत नाही आहोत. आम्ही मोजक्याच जागांवर निवडणूक लढवत आहोत.

…म्हणून राहुल गांधींनी वायनाडमधून निवडणूक लढवू नये का?

राहुल गांधी किंवा काँग्रेस मी कोणाचीही वैयक्तिक नावे घेणार नाही. काँग्रेसने नेमके राजकारण काय आहे हे स्पष्ट करावे? त्यांना आरएसएस-भाजपाचा पराभव झालेला पाहायचा आहे की डाव्यांना पराभूत झालेले पाहायचे आहे? असा प्रश्न आहे. ही केवळ सीपीआयची जबाबदारी नाही. तेलंगणा विधानसभा निवडणुकीतही त्यांनी आम्हाला दोन जागांचे आश्वासन दिले होते. पण शेवटच्या क्षणी ते मागे फिरले होते.

तुमचे पती अन् सीपीआयचे सरचिटणीस डी राजांचे राहुल गांधींबरोबर चांगले संबंध आहेत. निवडणुकीची लढाई थोडी गुंतागुंतीची होणार का?
जेव्हा सीपीआय आणि डाव्या आघाडीने निवडणुकीत त्यांचे उमेदवार जाहीर केले. आमची लढाई जागा जिंकण्याची आणि आरएसएस-भाजपाला पराभूत करण्याची आहे. सोनिया गांधीजीसुद्धा आमच्या जवळ आहेत; मी त्यांच्याशी चांगले आणि मैत्रीपूर्ण संबंध आहेत. प्रश्न मैत्रीचा नाही, प्रश्न राजकारणाचा आहे. आज या देशाला मुख्य धोका आरएसएस-भाजपा फॅसिस्ट शक्तींपासून आहे. त्यांनी संविधान आणि त्याची मूल्ये नष्ट केली आहेत. त्यांनी लोकांमध्ये त्यांच्या धर्माच्या आधारे अक्षरशः फूट पाडली आहे. त्यामुळे हा देश वाचवायचा आहे.

तुमच्याकडे नेता म्हणून न पाहता सरचिटणीस यांची पत्नी म्हणून पाहिले जाते हे अयोग्य वाटते का?

मी माझ्या राजकीय कार्याला वयाच्या ८ व्या वर्षी विद्यार्थी दशेपासून सुरुवात केली. आदिवासी पालकांना एकत्र करून त्यांना त्यांच्या मुलांना शाळेत पाठवण्यास प्रोत्साहित केले. कारण ते सर्व माझे मित्र होते. माझी उमेदवारी हा कम्युनिस्ट पक्षात सर्वानुमते निर्णय होता. जेव्हा आपण एखाद्या गोष्टीवर चर्चा करतो, तेव्हा ती दुसऱ्यावर आपली मते लादत नाही. प्रत्येकाला आपले मत मोकळेपणाने आणि स्पष्टपणे मांडण्याची संधी आहे. पण शेवटी जेव्हा पक्ष निर्णय घेतो, तो पक्षाच्या फायद्याचा असतो आणि प्रत्येक जण स्वीकारतो आणि सहमत असतो. चर्चेदरम्यान अनेक गोष्टी बाहेर आल्या असतील, पण अंतिम परिणाम काय? उमेदवारांबाबत सर्वानुमते निर्णय घेण्यात आला आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: What benefit will rahul or congress gain by contesting elections from kerala said cpi wayanad candidate vrd
First published on: 27-02-2024 at 12:30 IST