कर्णधार गिरीश एर्नाकच्या अनुपस्थिती खेळत असलेल्या पुणेरी पलटण संघाला आजच्या सामन्यात पुन्हा एकदा पराभवाचा धक्का सहन करावा लागला आहे. गुजरात फॉर्च्युनजाएंट संघाने पुणेरी पलटणवर 37-27 अशी मात केली. चढाईपटू आणि बचावफळीतल्या खेळाडूंनी केलेल्या अष्टपैलू खेळामुळे गुजरातने सामन्यात बाजी मारली.
गुजरातच्या संघाने आज खऱ्या अर्थाने सामन्यावर वर्चस्व गाजवलं. चढाईत सचिन तवंर आणि महेंद्र राजपूत यांनी पुण्याच्या बचावफळीला खिंडार पाडलं. अनुभवी गिरीश एर्नाकची अनुपस्थिती आज पुण्याच्या संघाला चांगलीच जाणवली. सचिनने 10 तर महेंद्र राजपूतने 6 गुण कमावले. त्यांना बचावफळीत ऋतुराज कोरावीने 4 गुण कमावत चांगली साथ दिली. दुसरीकडे पुण्याच्या खेळाडूंना आपल्या नेहमीच्या सुरात येण्यासाठी थोडा वेळ लागला.
पहिल्या सत्रात सर्वबाद झाल्यानंतर पुणेरी पलटच्या नितीन तोमरने चढाईत चांगली झुंज देण्याचा प्रयत्न केला. त्याला बचावफळीतही काही खेळाडूंनी चांगली साथ दिली. मात्र तोपर्यंत गुजरातने सामन्यावर आपली पकड मजबूत बसवली होती. हीच पकड शेवटपर्यंत कायम ठेवत गुजरातने सामन्यात बाजी मारली.
अवश्य वाचा – सहाव्या हंगामात प्रो-कबड्डीला अल्प प्रतिसाद, प्रेक्षकसंख्या घटल्याची माहिती
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on October 30, 2018 9:17 pm