19 February 2019

News Flash

पुण्यात राज्य शिक्षण मंडळाच्या कार्यालयात तरुणीचा आत्महत्येचा प्रयत्न

कोंढवा येथे राहणारी पूनम शुक्रवारी संध्याकाळी पाचच्या सुमारास महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या कार्यालयात पोहोचली.

(प्रतिकात्मक छायाचित्र)

पुण्यातील राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या कार्यालयात एका तरुणीने शुक्रवारी संध्याकाळी स्वत:ला जाळून घेत आत्महत्येचा प्रयत्न केला. पूनम (वय २४) असे त्या तरुणीचे नाव असून तिच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

कोंढवा येथे राहणारी पूनम शुक्रवारी संध्याकाळी पाचच्या सुमारास महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या कार्यालयात पोहोचली. कार्यालयातील तिसऱ्या मजल्यावरील स्वच्छतागृहात तिने अंगावर रॉकेल ओतून घेत स्वत:ला जाळून घेतले. यात ती ५० टक्क्यांपेक्षा अधिक भाजली. पूनमने जाळून घेतल्याचे लक्षात येताच कार्यालयातील कर्मचारी व अन्य मंडळींनी तिला तातडीने रुग्णालयात दाखल केले.

कार्यालयात आल्यावर पूनम एका लिपिकाला भेटली. त्याच्याशी वाद झाल्यानंतर पूनम स्वच्छतागृहात गेली होती. त्या लिपिकाशी पूनमचे प्रेमसंबंध होते, असे प्राथमिक तपासात समोर आले आहे. पूनमने आत्मदहन करण्यापूर्वी सुसाईड नोटही लिहीली होती. पोलिसांना ती नोट सापडली आहे. या प्रकरणी शिवाजी नगर पोलीस अधिक तपास करत आहेत.

First Published on September 14, 2018 8:47 pm

Web Title: 24 tyear old attempts suicide immolate self in mahahsscboard office in pune