पिंपरी- चिंचवडमधील कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी घटना मंगळवारी रात्री घडली. चिंचवड पोलीस ठाण्याजवळच एका तरुणाची हत्या करण्यात आली आहे. आकाश लांडगे (वय २४) असे या मृत तरुणाचे नाव आहे. पोलीस ठाण्याजवळ हत्या केल्यानंतर आरोपींनी तिथून पळ काढल्याने चिंचवड पोलिसांच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत.

आकाश लांडगे याची गुन्हेगारी पार्श्वभूमी असून या भागात रणजित चव्हाण आणि मयूर घोलप असे दोन गट आहेत. गुन्हेगारी वर्चस्वावरुन या दोन गटांमध्ये नेहमीच वाद होतात. आकाश लांडगे हा मयूर घोलप गटातला होता. पूर्ववैमनस्यातून मंगळवारी रात्री आकाश लांडगेवर चौघांनी हल्ला केला. कोयता, सिमेंटचे गट्टू, लोखंडी रॉड याने आकाशला मारहाण करण्यात आली. रणजित चव्हाण, स्वप्नील उर्फ बाबा मोरे, प्रफुल्ल ढोकणे, सोन्या वराडे अशी या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी प्रशांत ज्ञानोबा वीर यांनी चिंचवड पोलिसात फिर्याद नोंदवली आहे. आरोपींचा शोध चिंचवड पोलीस घेत आहेत.

trees in Mumbai being killed by poison
पूर्व द्रुतगती मार्गावरील ५० झाडांवर विषप्रयोग; पालिका अधिकाऱ्यांच्या तक्रारीनंतर अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल
Citizens object to concreting works at unnecessary places in navi mumbai
नको तेथे काँक्रीट रिते! अनावश्यक ठिकाणी काँक्रीटीकरणाच्या कामांना नागरिकांचा आक्षेप, शहरभर वाहतूककोंडी
Why MHADA will not build houses in high income group
म्हाडाकडून यापुढे उच्च उत्पन्न गटातील घरांची निर्मिती नाही?
श्श्श्श… वाघोंबांची तलावामध्ये सुरू आहे पूल पार्टी; ‘ठंडा ठंडा कुल कुल’मुळे बाहेर निघायलाच तयार नाही

आरोपी रणजित चव्हाणवर ८ गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असून पोलिसांनी त्याच्यावर तडीपारची कारवाई केलेली आहे. तर त्याचा साथीदार स्वप्नील उर्फ बाबा मोरे याच्यावर दोन गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले.

रात्री साडे अकराच्या सुमारास आकाशच्या गाडीचे पेट्रोल संपले होते. पेट्रोल टाकून सुद्धा गाडी सुरू होत नव्हती. याच दरम्यान हल्लेखोरांनी त्याला गाठले. मारहाणीत जखमी झालेल्या आकाशला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, पहाटे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.