शहरात प्रतिबंधित क्षेत्रात वाढ

पुणे : शहरातील करोनाबाधितांची संख्या वाढल्यामुळे प्रतिबंधित क्षेत्रातही वाढ झाली आहे. शहरात नव्याने ५० प्रतिबंधित क्षेत्रे जाहीर करण्यात आली असून एकू ण १०९ प्रतिबंधित क्षेत्रे झाली आहेत. शहरात १७ जूनपर्यंत प्रतिबंधित क्षेत्रांची संख्या ७४  एवढी होती.

या भागात जाण्या-येण्याचे मार्ग बंद करण्याचे आदेश महापालिकेने पोलिसांना दिले आहेत. करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर महापालिके कडून प्रतिबंधित क्षेत्राचा दर काही दिवसांनी आढावा घेण्यात येत आहे. त्यानुसार प्रतिबंधित क्षेत्राची सुधारित यादी महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी जाहीर के ली आहे. त्यामध्ये नव्या ठिकाणांची वाढ झाली आहे.

प्रतिबंधित क्षेत्र आणि सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र महापालिके कडून जाहीर करण्यात आली आहेत. सध्या करोनाबाधितांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. त्यामुळे या क्षेत्राची व्याप्तीही वाढली आहे. जुन्या प्रतिबंधित क्षेत्राचा आढावा घेताना १५ क्षेत्रे वगळण्यात आली. तर नव्याने ५० ठिकाणांचा समावेश करण्यात आला. एकू ण ७४ पैकी ९ क्षेत्रांची फे ररचना करून सुधारणा करण्यात आली. सध्या प्रतिबंधित क्षेत्र ६.६९ चौरस किलोमीटर एवढे झाले आहे.

सदाशिव पेठेतील राजेंद्रनगर, मनपा कॉलनी, पर्वती दर्शन परिसरातील चाळ क्रमांक ६७, ७०, ९३, ९९, १०७, साईबाबा वसाहत परिसर, गणेश पेठेतील संत कबीर चौक ते डुल्या मारुती चौकापर्यंतचा लक्ष्मी रस्ता, नेहरू रस्ता परिसर, घोरपडी येथील शक्तिनगर परिसर, ढवळे वस्ती, हडपसरमधील सव्‍‌र्हेक्षण क्रमांक  २८२, मुंढवा परिसर, अरण्येश्वर येथील तावरे कॉलनी परिसर, शाहू कॉलेज रस्ता परिसर, कात्रज परिसरातील अय्यप्पा मंदिरालगतचा परिसर, शिवशंकर कॉलनी, बिबवेवाडी ओटा वसाहत, अपर इंदिरानगर, व्हीआयटी कॉलेज परिसर, येरवडा येथील अशोकनगर, भाटनगर, गणेशनगर, रामनगर, जय जवान नगर, यशवंतनगर, पर्णकु टी पायथा, शनी आळी, गवळीवाडा, हडपसरमधील अण्णा भाऊ साठे वस्ती, लक्ष्मीनगर, संगमवाडी, शिवाजीनगर, वाक डेवाडी, संभाजीनगर, महापालिका वसाहत, खराडीमधील थिटे वस्ती, थिटेनगर, भेकराईनगर, कोंढवा बुद्रुक, बिबवेवाडी येथील चैत्रबन परिसर, एरंडवणे येथील एसएनडीटी महाविद्यालय परिसर, कर्वे रस्त्याचा काही भाग, कोथरूड येथील हॅप्पी कॉलनीजवळील वसाहत, सिंहगड रस्त्यावरील हिंगणे बुद्रुक, पौड फाटा, मेगा सिटी, के ळेवाडी, राजीव गांधी वसाहत, डहाणूकर कॉलनी या भागाचा प्रतिबंधित क्षेत्रात समावेश आहे. यामुळे शहरातील प्रतिबंधित क्षेत्राची व्याप्ती ६.६९ चौरस किलोमीटर एवढी झाली आहे.

दरम्यान, प्रतिबंधित क्षेत्राचा नियमित आढावा महापालिका स्तरावर घेण्यात येणार आहे. ज्या भागातील रुग्णसंख्या कमी झाली असेल असा भाग प्रतिबंधित क्षेत्रातून वगळण्यात येणार आहे.