३० नोव्हेंबपर्यंत योजना सुरू राहणार

पुणे : मिळकतकर थकबाकीदारांसाठी महापालिके कडून राबविण्यात येत असलेल्या अभय योजनेअंतर्गत २४ हजार ४६० मिळकतधारकांनी ५५ कोटी ५२ लाख रुपयांचा करभरणा के ला आहे. सोमवारी (१९ ऑक्टोबर) एका दिवसांत १ हजार ९८१ मिळकतकर थकबाकीदारांनी ५ कोटी ९१ लाख रुपयांचा निधी तिजोरीत जमा के ला. महापालिके च्या कर आकारणी आणि करसंकलन विभागाकडून ही माहिती देण्यात आली.

66364 crore collection through new 185 schemes of mutual funds
म्युच्युअल फंडांचे नवीन १८५ योजनांद्वारे ६६,३६४ कोटींचे संकलन
BMC Recruitment 2024
बृहन्मुंबई महानगरपालिकेत ‘या’ पदासाठी निघाली मोठी भरती! ९० हजारपर्यंत मिळू शकतो पगार
Slum cleaning contract in court tender extended till April 3
झोपडपट्टी स्वच्छतेचे बहुचर्चित कंत्राट न्यायालयीन कचाट्यात, निविदेला ३ एप्रिलपर्यंत मुदतवाढ
Panvel Municipal Corporation
एका दिवसांत तीन कोटींहून अधिक कर जमा, पनवेल महापालिकेच्या तिजोरीत आतापर्यंत ३३३ कोटी रुपये

थकबाकी वसुलीसाठी मिळकतकर अभय योजना राबविण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. मिळकतकराची ५० लाखांपर्यंतची थकबाकी असलेल्या मिळकतधारकांसाठी येत्या ३० नोव्हेंबपर्यंत अभय योजना सुरू राहणार आहे. योजना सुरू झाल्यानंतर या योजनेअंतर्गत २४ हजार ४६० थकबाकीदारांनी ५५ कोटी ५२ लाख रुपयांचा करभरणा के ला आहे. थकबाकीवरील व्याजातील सवलतीचा विचार करता या मिळकतधारकांना एकू ण २५ कोटी ६६ लाख रुपयांची सवलत दिली गेली आहे.

मिळकतकर भरणे सुलभ व्हावे, यासठी महापालिके च्या संबंधित क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत नागरी सुविधा के ंद्रे सोमवार ते शुक्रवार या कालावधीत सकाळी १० ते दुपारी ४ पर्यंत सुरू ठेवण्यात येणार आहेत. तर शनिवार आणि रविवारी ठरावीक वेळेत या के ंद्रात धनादेश, रोख रक्कम स्वीकारली जाणार आहे. याशिवाय ऑनलाइन पद्धतीनेही करभरणा करता येणार आहे.

योजना काय?

थकबाकी असलेल्या मिळकतींच्या देयकांवर शास्ती आणि दंड आकारण्यात येतो. त्यामुळे मिळकतकराची थकबाकी मोठय़ा प्रमाणावर वाढली आहे. या योजनेअंतर्गत थकबाकीवर दरमहा आकारण्यात येत असलेल्या दोन टक्के दंडाच्या रकमेत ८० टक्के सवलत देण्यात आली आहे. या योजनेतून मोबाइल टॉवर्सच्या थकबाकीला वगळण्यात आले आहे. योजनेअंतर्गत जास्तीत जास्त नागरिकांनी मिळकतकर थकबाकीची रक्कम भरून भविष्यातील कारवाई टाळावी, असे आवाहन कर आकारणी आणि करसंकलन विभागाचे प्रमुख विलास कानडे यांनी के ले आहे.

मिळकतकरातून ९०३ कोटींचे उत्पन्न

अभय योजनेतून मिळणारे उत्पन्न आणि यापूर्वी भरण्यात आलेला कर यातून ९०३ कोटी रुपये महापालिके च्या तिजोरीत जमा झाले आहेत. शहरातील १० लाख १० हजार मिळकतदारांपैकी ६ लाख ८ हजार ६५५ मिळकतधारकांनी करभरणा के ल्याचे या विभागाचे प्रमुख विलास कानडे यांनी सांगितले. तर सोमवारी १ हजार ९८१ थकबाकीदारांनी ५ कोटी ९१ लाखांचा करभरणा के ला आहे.