संगीताच्या सर्व प्रांतांमध्ये मुशाफिरी करणारे अवलिया संगीतकार अशोक पत्की हे शुक्रवारी (१२ जून) ‘लोकसत्ता’च्या ‘सहज बोलता बोलता’ या उपक्रमात सहभागी होत आहेत. सुगम संगीतातील पाच दशकांची सुरेल वाटचाल त्यांच्याशी होणाऱ्या गप्पांतून उलगडेल. सायंकाळी पाच वाजता हा वेबसंवाद रंगणार आहे.

‘बीज अंकुरे अंकुरे ओल्या मातीच्या कुशीत’ हे पत्की यांनी संगीतबद्ध केलेले ‘गोटय़ा’ या मालिकेचे शीर्षकगीत आजही रसिकांनी स्मृतींच्या कुपीत जपून ठेवले आहे. दूरचित्रवाणीवरील मालिकांची शीर्षकगीते, नाटक-चित्रपट क्षेत्रांतील कारकीर्दीसह जाहिरातक्षेत्रात पत्की यांनी दिलेले योगदान समजून घेण्याचीही संधी या वेबसंवादाच्या माध्यमातून मिळणार आहे. देशभरातील ज्येष्ठ गायक-गायिकांच्या आवाजामध्ये ‘मिले सूर मेरा तुम्हारा’ या विविध भाषांतील गीताचे संगीत संयोजन हे पत्की यांचे खास वैशिष्टय़ मानले जाते.

सहभागी होण्यासाठी..   https://tiny.cc/LS_SahajBoltaBolta_12June या लिंकवर जाऊन नोंदणी करा.

या उपक्रमाचे लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटी सहप्रायोजक आहेत.