महापालिकेची पोलिसांकडे मागणी; पाणीपुरवठा योजनेचे काम पुन्हा सुरू करण्याचे नियोजन

पुणे : शहराच्या पूर्व भागाचा पाणीप्रश्न सोडविण्यासाठी उपयुक्त ठरणारी भामा-आसखेड पाणीपुरवठा योजना पुन्हा पोलीस बंदोबस्तामध्ये सुरू करण्याचे नियोजन महापालिके कडून करण्यात आले आहे. या योजनेतील अवघ्या नऊशे मीटर जलवाहिनीचे काम बाकी आहे. हे काम पूर्ण करण्यासाठी पोलिसांनी बंदोबस्त उपलब्ध करून द्यावा, असे पत्र महापालिके ने पोलिसांना दिले आहे. त्यानुसार येत्या आठवडाभरात हे काम सुरू होण्याची शक्यता महापालिके कडून व्यक्त करण्यात आली आहे.

महापालिके च्या वतीने भामा-आसखेड पाणीपुरवठा योजना हाती घेण्यात आली आहे. गेल्या सहा वर्षांपासून हे काम सुरू असून काम पूर्ण होण्याची मुदत सातत्याने लांबणीवर पडत आहे. कधी राजकीय मुद्दा उपस्थित करून तर कधी प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन आणि नुकसानभरपाईच्या मुद्यावरून या योजनेचे काम सातत्याने बंद पडले. त्यामुळे या योजनेच्या प्रकल्पीय खर्चातही वाढ झाली होती. अनेक अडचणींनंतर हे काम अंतिम टप्प्यात आले असताना पुन्हा ते पुनर्वसन आणि नुकसानभरपाईच्या मुद्यावर बंद पडले. नुकसानभरपाईची रक्कम महापालिके ने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जमा के ल्यानंतर हे काम पूर्ण होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत होती. मात्र टाळेबंदीमुळे हे काम पुन्हा बंद पडले.

मात्र आता टाळेबंदी शिथिल के ल्यानंतर या योजनेच्या कामाला गती देण्यासाठी महापालिके च्या पाणीपुरवठा योजनेकडून प्रयत्न सुरू आहेत. या योजनेचे के वळ नऊशे मीटर लांबीचे काम राहिले आहे. त्यामुळे हे काम पूर्ण करण्याची परवानगी पोलिसांनी द्यावी आणि त्यासाठी बंदोबस्त द्यावा, असे पत्र महापालिके ने पोलिसांना दिले आहे, अशी माहिती भामा-आसखेड पाणीपुरवठा योजनेचे प्रमुख, अधीक्षक अभियंता प्रवीण गेडाम यांनी दिली.

पोलिसांनी महापालिके ला काम करण्यास मान्यता दिली तर येत्या महिन्याअखेपर्यंत हे काम पूर्ण करण्याचे नियोजन महापालिके कडून करण्यात आले आहे. मे अखेपर्यंत ही योजना पूर्ण झाल्यास शहराच्या पूर्व भागाचा पाणीप्रश्न सुटण्यास मदत होणार आहे.

योजनेचे काम अंतिम टप्प्यात

वडगांवशेरी, चंदननगर, कळस, धानोरी, संगमवाडी, येरवडा, लोहगांव, कल्याणीनगर आणि खराडी या पूर्व भागात सातत्याने होणारा अनियमित आणि अपुरा पाणीपुरवठा लक्षात घेऊन ही योजना हाती घेण्यात आली. सन २०१४ मध्ये या योजनेच्या कामाला प्रारंभ झाला. सन २०४१ सालापर्यंत लोकसंख्या गृहीत धरून ही योजना कार्यान्वित करण्यात आली. सहा वर्षांत या योजनेवर तब्बल साडेचारशे कोटीहून अधिक खर्च झाला असून योजना मुदतीमध्ये पूर्ण करण्याचा कालावधी सातत्याने विविध कारणांनी लांबणीवर पडला होता. मात्र आता योजनेचे काम अंतिम टप्प्यात आल्यामुळे पूर्व भागाला दिलासा मिळण्याची शक्यता आहे. या धरणातून २.६४ अब्ज घनफू ट (टीएमसी) पाणी उचलण्यात येणार आहे. जलवाहिनीद्वारे ५८ किलोमीटर अंतरावर या पाण्याचे वितरण करण्यात येणार आहे.

भामा-आसखेड पाणीपुरवठा योजनेचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. टाळेबंदीमुळे काम थांबले होते. मात्र आता काम सुरू करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. हे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याची सूचना संबंधित खात्याला के ली आहे.

– शेखर गायकवाड, आयुक्त, महापालिका