22 January 2021

News Flash

पुणे : महिलांच्या वेशात चोरट्यांनी पळवलं एटीएम; CCTV फुटेज व्हायरल

दोरीनं बांधून फोडलं एटीएम

पुण्यातील शिरुर तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून एटीएम चोरीच्या घटना घडत आहे. शिक्रापूर येथील पाबळ चौक परिसरात असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाचे एटीएम चोरट्यांनी लंपास केलं आहे. एटीएमवर डल्ला मारण्यासाठी चोरट्यांनी अजबच शक्कल लढवली होती. एटीएम चोरी करण्यासाठी चोरटे महिलांच्या वेशात आले होते. या घटनेचं CCTV फुटेज मिळालं आहे.

CCTV फुटेजमध्ये एटीएम चोरल्याचं दिसत आहे. महिलाच्या वेशात असलेल्या चोरट्यांनी एटीएमला दोर बांधून मशीन पळवलं. एटीएम मशीनमध्ये १९ लाख ५० हजार रुपयांची रक्कम होती. एटीएम मशीनला दोरी बांधली. त्यानंतर ते मशीन स्कोर्पिओमधून लंपास केल्याचं समोर आलं आहे.

पाहा व्हिडीओ :


या प्रकरणाचा शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून सतत होणाऱ्या चोऱ्यांमुळे नागरिकांमध्ये दहशत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 27, 2020 10:41 am

Web Title: cctv maharashtra atm with rs 19 lakh inside it stolen in shikrapur nck 90
Next Stories
1 बालभारतीकडून अभ्यास गट बरखास्त
2 ..तर पुण्यात आलातच कशाला?
3 पिंपरीत इंग्लडमधून आलेला प्रवाशी निघाला करोना बाधित; ७० जनांचे रिपोर्ट निगेटिव्ह
Just Now!
X