पुणे : करोनाच्या पार्श्वभूमीवर आषाढी वारी शासन सांगेल त्या संख्येत संपूर्ण पायी व्हावी अशी अद्यापही वारकऱ्यांची अपेक्षा आहे. मात्र, यंदाही राज्य सरकारने वाहनांनी त्या त्या गावातून दहा पालख्या पंढरपूरला नेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यावर वारकऱ्यांच्या संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. करोनाच्या पार्श्वभूमी     वर आषाढी वारी पायी करण्याऐवजी मानाच्या दहा पालख्या त्या त्या गावांहून वाहनाने पंढरपूरला नेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पायी वारीची परंपरा खंडित होऊ नये म्हणून वाखरी ते पंढरपूर पोलीस बंदोबस्तात पायी वारी होणार आहे.   तुकाराम महाराज पालखी सोहळा प्रमुख संजय मोरे म्हणाले, ‘पायी वारीबाबत शासनाचा निर्णय झाल्याची अधिकृत प्रत अद्याप मिळालेली नाही.  वारकऱ्यांच्या आणखी काही मागण्या विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्याकडे मांडू.’

आळंदी देवस्थानचे प्रमुख विश्वस्त अभय टिळक म्हणाले, ‘मर्यादित संख्येत पायी वारी होण्याबाबत आम्ही सर्वांनीच प्रयत्न के ला. वारकरी शिस्त पाळतील, मात्र पालख्या रस्त्याने निघाल्यानंतर होणाऱ्या संभाव्य गर्दीबाबत शासनाला चिंता होती. करोना संसर्गाच्या दोन लाटांचा बसलेला तडाखा आणि संभाव्य तिसरी लाट लक्षात घेता शासनाने हा निर्णय प्राप्त परिस्थितीनुरूप घेतला आहे. शासनाचा निर्णय ही तडजोड असून प्राप्त परिस्थितीत अपरिहार्य आहे. पायी वारी नेण्याचा निर्णय घेतल्यास संसर्गाच्या अनुषंगाने येणारे सर्व मुद्दे टाळता येणारे नाहीत. परिणामी शासनाचा निर्णय यंदाही स्वीकारावा लागणार आहे.’

mumbai high court on sawantwadi dodamarg wildlife corridor
विश्लेषण : सावंतवाडी-दोडामार्ग कॉरिडॉर पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील? न्यायालयाचा आदेश काय? होणार काय?  
Loksatta anvyarth Naxalites killed in Kanker district of Chhattisgad
अन्वयार्थ: आता दीर्घकालीन उपायच गरजेचा..
Versova Koliwada, facilities Versova koliwada,
वर्सोवा कोळीवाड्याला सोयी-सुविधांची प्रतीक्षा
Indiscriminate firing in nagpur by criminal over money of MD
नागपुरात एमडीच्या पैशावरून गुन्हेगाराचा अंधाधुंद गोळीबार, कुख्यात टोळ्या पुन्हा…

दरम्यान, करोनाच्या पार्श्वभूमी     वर आम्ही कोणताही संख्येचा आग्रह न धरता पायी पालखी सोहळा असावा, अशी मागणी सरकार दरबारी के ली होती. मात्र, या सहिष्णू विनंतीला झुगारत प्रशासकीय वर्गाने आपल्यावरील ताण वाढू नये यासाठी वाहनांनी वारी करण्याची शिफारस के ली. वारीची परंपरा जपण्यासाठी अल्पसंख्येत का होईना, संपूर्ण पायी वारीला परवानगी देण्याची मागणी वारकरी संप्रदाय संघाचे राष्ट्रीय प्रवक्ते ह.भ.प. रामकृष्ण महाराज वीर यांनी के ली आहे.

श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती शासन स्थापित असल्याने राज्य शासनाच्या निर्णयाशी बांधील आहोत. मात्र, वारकऱ्यांचा प्रतिनिधी म्हणून त्यांच्या भावना सरकारपर्यंत पोहोचवण्याचे कामही करावे लागते. राज्यातील इतर सर्व व्यवहार सुरू झाले आहेत. वारकऱ्यांनादेखील स्वत:च्या जिवाची पर्वा आहे. त्यामुळे शासनाने पायी वारीला परवानगी देण्याची वारकऱ्यांची आणि माझी व्यक्तिश: मागणी आहे.

– ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर, सह अध्यक्ष, श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती

कारण काय? मानाचे दहा पालखी प्रमुख आणि देवस्थानांचे विश्वस्त यांच्या आणखी काही मागण्या असल्यास याबाबत पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्याशी चर्चा करावी, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीमध्ये सांगितल्याने पायी वारीबाबत वारकऱ्यांच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या आहेत.