News Flash

अभिनेत्री पायल रोहतगीविरोधात गुन्हा

शहर काँग्रेसच्या सरचिटणीस संगीता तिवारी यांनी तक्रार दिली आहे.

अभिनेत्री पायल रोहतगीविरोधात गुन्हा
पायल रोहतगी

पुणे : गांधी परिवार तसेच काँग्रेस पक्षाविषयी समाजमाध्यमात बदनामीकारक मजकूर लिहिल्याप्रकरणी अभिनेत्री पायल रोहतगीविरोधात बुधवारी गुन्हा दाखल करण्यात आला.

याबाबत शहर काँग्रेसच्या सरचिटणीस संगीता तिवारी यांनी तक्रार दिली आहे. रोहतगीने गांधी परिवार आणि काँग्रेस पक्षाबाबत बदनामीकारक मजकू र लिहिला आहे. याबाबत तिने समाजमाध्यमावर ध्वनिचित्रफीतही प्रसारित केली होती. तिने समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला, असे तिवारी यांनी सायबर पोलिसांकडे दाखल केलेल्या तक्रार अर्जात म्हटले होते. या प्रकरणाची सायबर पोलिसांकडून चौकशी करण्यात आली. त्यानंतर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात संबंधित प्रकरण तपासासाठी सोपविण्यात आले. शिवाजीनगर पोलिसांनी या प्रकरणी रोहतगी तसेच ध्वनिचित्रफीत प्रसारित करणाऱ्या अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 2, 2021 1:15 am

Web Title: crime against actress payal rohatgi akp 94
Next Stories
1 ‘आयटीआय’च्या नोंदणीत ४५ हजारांनी घट
2 सहकारी संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा
3 तकलादू कडी, कुलपे चोरटय़ांच्या पथ्यावर
Just Now!
X