पुणे सोलापूर रस्त्यावरच्या कदम वाक वस्ती ग्रामपंचायतीसमोर एर्टिगा आणि ट्रकचा अपघातात ९ विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. यामध्ये परवेज अश्पाक अत्तारचाही समावेश होता.  परवेज  इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षाला शिकत होता.

या अपघातानंत मयत परवेज यांचा आते भाऊ मोहसीन आतार यांच्याशी संवाद साधला असता ते म्हणाले की, परवेजचा मित्र परिवार मोठा होता. मित्रांसोबत तो नेहमी फिरायला जात असे. तो कालही त्याच्या सगळ्या मित्रांसोबत गेला होता. त्याच्यासोबत असं काही घडेल असं वाटलंही नव्हतं हे सांगताना मोहसीन यांना अश्रू अनावर झाले होते. तर तो पुढे म्हणाला की, परवेजचे वडील आठवडी बाजारामध्ये काथ्या साबण विक्रीचा दुकान लावतात. त्यांच्या त्या व्यवसायावर त्यांनी परवेजला बीसीएच्या कॉलेजमध्ये प्रवेश घेऊन दिला. तो शेवटच्या वर्षाला होता. या वर्षी पास झाल्यावर एका चांगल्या कंपनीत कामाला लागून वडिलांचे स्वप्नं पूर्ण करायचे आहे. असं आम्हाला परवेज सांगायचा पण त्याच्या अपघाती निधनामुळे त्याचं हे स्वप्न अपूर्णच राहिलं असं मोहसीनने सांगितलं. परवेजच्या आठवणी सांगताना मोहसीनला अश्रू अनावर झाले.

पुणे सोलापूर रोड झालेल्या अपघातामधील मृतांची नावं
अक्षय भारत वाईकर, विशाल सुभाष यादव, निखिल चंद्रकांत वाबळे, सोनू ऊर्फ नूर मोहम्मद अब्बास दाया, परवेज अश्पाक अत्तार, शुभम रामदास भिसे, अक्षय चंद्रकांत घिगे, दत्ता गणेश यादव आणि जुबेर अजिज मुलाणी