26 February 2020

News Flash

धक्कादायक ! पुण्यात पोटच्या मुलीचा खून करून बापाची आत्महत्या

कौटुंबिक वादातून ही धक्कादायक घटना घडली आहे.

(संग्रहित छायाचित्र)

पोटच्या मुलीचा गळा आवळून खून केल्यानंतर बापाने स्वत:ला गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडली आहे. धनकवडी भागात आठ वर्षाच्या पोटच्या मुलीचा गळा आवळून बापाने स्वत:चे आयुष्यही संपवले आहे. या धक्कादायक घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. सहकारनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आला आहे. आशिष भोंगळे (वय 49) असे क्रूर पित्याचे नाव आहे. कौटुंबिक वादातून हा प्रकार घडल्याचे शेजारील लोकांनी सांगितले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आशिषचे पत्नीसोबत सतत भांडणे होत असल्याने दोघे वेगळे राहत होते. तर आशिष हा आई आणि त्याच्या दोन मुलासोबत धनकवडी येथील काशिनाथ पाटीलनगर येथे राहत होता. शनिवारी रात्रीच्या सुमारास आशिष यांची आई काही कामानिमित्त घराबाहेर गेल्या. त्याच दरम्यान मुलीचा गळा आवळून खून केला आणि त्यानंतर आशिषने पंख्याला साडीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली.

First Published on August 19, 2019 10:27 am

Web Title: father murdered daughter suicide in pune nck 90
Next Stories
1 आठ वर्षांच्या मुलीचा खून करून पित्याची आत्महत्या
2 वाहतूक नियम मोडण्यात पिंपरी-चिंचवड आणि नागपूरकरही आघाडीवर
3 कलम ३७० रद्द केल्यामुळे जम्मू-काश्मीर देशाच्या मुख्य प्रवाहामध्ये आले : सुब्रमण्यम स्वामी
Just Now!
X