22 September 2020

News Flash

‘एफटीआयआय’मधील संपाचे भवितव्य आज ठरणार!

२९ सप्टेंबरला दुपारी ११ वाजता मुंबईत ‘फिल्म्स डिव्हिजन’ कार्यालयात ही बैठक होणार असल्याचे लिहिले आहे

‘एफटीआयआय’मध्ये गेले १०९ दिवस सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या संपाचे भवितव्य मंगळवारी ठरणार आहे. माहिती व प्रसारण मंत्रालयाने विद्यार्थ्यांशी चर्चा करण्याची वेळ निश्चित केल्यास गेली १८ दिवस सुरू असलेले काही विद्यार्थ्यांचे उपोषण मागे घेतले जाईल, असे पत्र विद्यार्थी संघटनेने मंत्रालयाला पाठवले होते. या पत्राला प्रतिसाद देत मंत्रालयाने मंगळवारी बैठक घेण्याचे ठरवले असून या पाश्र्वभूमीवर विद्यार्थ्यांनी रविवारी सकाळी साडेदहा वाजता तीन विद्यार्थ्यांचे सुरू असलेले उपोषण मागे घेतले.
मंत्रालयाच्या चित्रपट विभागाचे सहसचिव के. संजय मूर्ती यांनी संघटनेचे अध्यक्ष हरिशंकर नाचिमुथ्थू यांना लिहिलेल्या पत्रात २९ सप्टेंबरला दुपारी ११ वाजता मुंबईत ‘फिल्म्स डिव्हिजन’ कार्यालयात ही बैठक होणार असल्याचे लिहिले आहे. या बैठकीस नाचिमुथ्थू यांच्यासह विकास अर्स, रणजित नायर, रीमा कौर, मलयज अवस्थी, अजयन अडाट आणि शिनी जेके हे ७ विद्यार्थी उपस्थित राहणार असल्याचे विद्यार्थी प्रतिनिधींनी कळवले.
दरम्यान, अमेरिकेतील १०० अभ्यासक व विद्यार्थ्यांनी एफटीआयआयमधील तिढा सोडवण्याची व आक्षेप घेतल्या गेलेल्या व्यक्तींच्या नियुक्तया रद्द करण्याची विनंती पंतप्रधान नरेंद्र मोदींना केली असल्याची माहितीही विद्यार्थ्यांनी दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 29, 2015 3:23 am

Web Title: ftii strike meeting hunger strike
Next Stories
1 १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकांनी एकोणीस जणांना रुग्णालयात पोहोचवले
2 पिंपरीची मिरवणूक शांततेत; राजकारण्यांची ‘चमकोगिरी’
3 विसर्जन मिरवणूक रद्द करून मंडळांची विधायक कामांना मदत
Just Now!
X