News Flash

माजी उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांना श्रद्धांजली

आर. आर. पाटील यांच्या दु:खद निधनाबद्दल त्यांना शहर राष्ट्रवादी, जिल्हा काँग्रेस, सामाजिक संस्था आणि विविध संघटनांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली.

| February 17, 2015 03:03 am

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांच्या दु:खद निधनाबद्दल त्यांना शहर राष्ट्रवादी, जिल्हा काँग्रेस, सामाजिक संस्था आणि विविध संघटनांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली.
राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टी पुणे शहराच्या वतीने आर. आर. पाटील यांना श्रद्धांजली अर्पण केली. या वेळी विभागाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर उपस्थित होत्या. पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे पाटील यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. या वेळी अॅड. अभय छाजेड, शरद रणपिसे, मुबंईचे माजी उपमहापौर व निरीक्षक राजेश शर्मा उपस्थित होते. या वेळी छाजेड, शर्मा यांनी आबांबद्दल विचार मांडले. राष्ट्रवादी कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेच्या वतीने आर. आर. पाटील यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 17, 2015 3:03 am

Web Title: homage to r r patil
टॅग : R R Patil
Next Stories
1 पेट कार्निव्हल शुक्रवारपासून सुरू
2 कॉ. गोविंद पानसरे यांच्यावरील हल्ल्याचा पुणे शहरात तीव्र निषेध
3 काम वाढवा, पक्ष वाढवा आणि कार्यतत्पर व्हा- राज ठाकरे
Just Now!
X