News Flash

पुण्यात लष्कराचा गणवेश घालून फिरणारा तरुण ताब्यात

वानवडी येथील आर्म फोर्स मेडिकल कॉलेजच्या परिसरात ही कारवाई करण्यात आली आहे.

संग्रहित छायाचित्र

पुण्यात लष्कराचा गणवेश घालून फिरणाऱ्या तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्याकडून काही संशयास्पद कागदपत्रेही जप्त करण्यात आली आहेत. वानवडी येथील आर्म फोर्स मेडिकल कॉलेजचे बनावट ओळखपत्र त्याच्याकडून जप्त करण्यात आले आहे.

आर्म फोर्स मेडिकल कॉलेज परिसरात एक तरुण लष्कराच्या गणवेशात फिरत होता. संशय आल्याने पोलिसांनी त्याची चौकशी केली. मात्र, तरुणाने समाधानकारक उत्तर न दिल्याने पोलिसांनी त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतल्याचे वृत्त एबीपी माझा या वृत्तवाहिनीने दिले आहे. या तरुणाकडून काही संशयास्पद कागदपत्रेही जप्त करण्यात आली आहे.

 

 

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 25, 2018 10:10 am

Web Title: man wearing an army uniform detained wanwadi armed forces medical college
Next Stories
1 महापालिकेमुळे जुलैपर्यंतचे पाण्याचे नियोजन लांबणीवर
2 आपल्या संस्कृतीतील गोष्टी आपणच सांगायला हव्यात
3 पावसाअभावी ज्वारीची पिके करपल्याने हुरडा पाटर्य़ावर संक्रांत
Just Now!
X