News Flash

पिंजरा मालिकेतील ‘या’ अभिनेत्रीला अटक

'रोल नंबर १८' या चित्रपटातील अभिनेत्याने तिच्याविरुद्ध तक्रार दाखल केली

एका नवोदित अभिनेत्याला धमकी देऊन खंडणी उकल्याप्रकरणी ‘पिंजरा’ या लोकप्रिय मालिकेमध्ये झळकलेली अभिनेत्री सारा श्रवणला पुणे पोलिसांनी अटक केली आहे. अटक केल्यानंतर पोलिसांनी श्रवणला शिवाजी नगर न्यायालयामध्ये हजर केले. त्यानंतर न्यायालयानं तिची  जामीनावर सुटका केल्याचं वृत्त आहे.

साराने ‘रोल नंबर १८’ या चित्रपटातील अभिनेत्याविरोधात कटकारस्थान करुन विनयभंगाची खोटी तक्रार दाखल केली होती. तसंच ही तक्रार मागे घेण्यासाठी तिने अभिनेत्याला धमकी देत त्याच्याकडून खंडणी उकळली. याप्रकरणी तिला गुन्हे शाखा यूनिट दोनने रात्री मुंबईमधून अटक केली. गुन्हा गंभीर असल्यामुळे तिने दाखल केलेला अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला होता. अटकपूर्व जामीन अर्जाला फिर्यादीच्या वतीने अ‍ॅड. मिलिंद पवार आणि अ‍ॅड. अजय ताकवणे यांनी विरोध केला होता.

साराने धमकी दिलेल्या अभिनेत्याचं नाव सुभाष दत्तात्रय यादव असं असून, त्यानं दिलेल्या फिर्यादीवरुन सहकारनगर पोलीस ठाण्यात तिच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर पोलिसांनी कारवाई करत तिला अटक केली. तसंच याप्रकरणी तिला मदत करणाऱ्या ‘रोल नंबर १८’ मधील अभिनेत्री रोहिणी मच्छिंद्र माने, दहशतवाद विरोधी पथकातील पोलीस उपनिरीक्षक अमोल विष्णू टेकाळे आणि राम भरत जगदाळे यांना यापूर्वीच अटक करण्यात आली होती. त्यांना अटक झाल्यानंतर साराने दुबईला पळ काढला होता. मात्र ती मुंबईमध्ये येताच तिला पोलिसांनी अटक केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 1, 2019 5:30 pm

Web Title: marathi actress sara shrawan arrested by pune polices crime branch ssj 93
Next Stories
1 World AIDS Day : एड्सग्रस्त तरुणीशी ‘त्यानं’ केला प्रेमविवाह; समाजात घालून दिला आदर्श
2 World AIDS Day : “एका घटनेनं माझं स्वप्न बेचिराख झालं, पण मी हरलो नाही”
3 पत्नीचा खून करुन तिने आत्महत्या केल्याचा बनाव, आरोपी पती अटकेत
Just Now!
X