अन्न आणि औषध प्रशासन(एफडीए)च्या निर्णयाचा विरोध करण्यासाठी पुण्यातील औषध दुकानदारांनी संपाचे हत्यार उपसले आहे. औषध दुकानधारकांच्या या बेमुदत संपामुळे पुण्यातील सामान्य जनतेचे मोठ्या प्रमाणावर हाल होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पुण्यातील जवळपास सात हजार औषधविक्रेत्यांनी अचानकपणे दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय जाहीर केला. अन्न आणि औषध प्रशासनातर्फे राज्यात औषधाची विक्री करताना काही नियम आखून देण्यात आले होते. यामध्ये डॉक्टरांची पावती बघितल्याशिवाय औषधाची विक्री करण्यावर बंदी घालण्यात आली होती. एफडीएच्या या अटी जाचक असल्याचे कारण पुढे करत औषध विक्रेत्यांनी संपाचा निर्णय घेतला आहे.