News Flash

गॅस सिलिंडरमधून गळती, पुण्यात आगीत मायलेक गंभीर जखमी

गुरुवारपेठ येथील शीतलादेवी चौकाजवळ असणार्‍या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर जोशी कुटुंबीय राहतात.

आगीत घरातील काही प्रमाणात साहित्य जळून खाक झाले.

पुण्यातील गुरुवार पेठ येथील शीतलादेवी चौकाजवळील इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर गॅस सिलिंडरमध्ये गळती झाल्याने आग लागल्याची घटना मंगळवारी घडली. यात अनुपमा किशोर जोशी (वय ५५) आणि हेमांशु किशोर जोशी (वय ३०) हे दोघे जखमी झाले आहेत.

अग्निशामक विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारपेठ येथील शीतलादेवी चौकाजवळ असणार्‍या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर जोशी कुटुंबीय राहतात. घरातील गॅस सिलिंडर संपल्याने सकाळी त्यांनी नवीन सिलिंडर लावला. यादरम्यान, नवीन सिलिंडरमधून गॅस गळती झाली आणि घरात आग लागली. या आगीत अनुपमा जोशी आणि हेमांशु जोशी हे दोघे गंभीर जखमी झाले. घरातील धूर पाहून शेजारी राहणाऱ्यांना जोशी यांच्या घरात आग लागल्याचे समजले. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू असून या आगीत घरातील काही प्रमाणात साहित्य जळून खाक झाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 30, 2019 12:23 pm

Web Title: mother son injured in fire at home in guruwar peth
Next Stories
1 विद्यापीठात आता ‘फायरिंग’ होणार!
2 मिळकतकरासाठी ऑनलाइनला पसंती
3 एप्रिलअखेर अमृत पायरीची आवक अत्यल्पच
Just Now!
X