मावळ तालुका मनसेचे अध्यक्ष बंटी ऊर्फ मंगेश ज्ञानेश्वर वाळंज (वय- 30, रा कामशेत, ता मावळ) यांना मंगळवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास कामशेत बाजारपेठेत अज्ञात इसमाने बंदूकीने गोळी झाडून खून करण्यात आला. या घटनेनंतर वाळंज यांचे नातेवाईक व समर्थकांनी कामशेत मध्ये मतदान केंद्राची, गाडय़ांची व दुकांनाची दगडफेक करुन तोडफोड केल्याने शहरात दिवसभर तणावाचे वातावरण होते. पुर्ववैमनस्यांतून हा खून झाला असल्याची दाट शक्यता आहे यापकरणी वाळंज यांचा भाऊ सोन्या उफ ऊ योगेश ज्ञानेश्वर वाळंज यांनी कामशेत पोलीस स्थानकात फि र्याद दिली आहे
मावळातील ग्रामीण भागाची मुख्य बाजारपेठे अशी ओळख असलेल्या कामशेत ग्रामपंचायतीचे आज मतदान होते. मतदान सकाळपासून सुरळीत सुरु होते. दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास बंटी वाळंज हे कार्यकर्त्यांसह कामशेत बाजारपेठेतील बॅक ऑफ  महाराष्ट्र समोरील बुथ समोर उभे असताना एका अज्ञात युवकांने अगदी जवळून वाळंज यांच्यावर गोळी झाडली. गोळी लागल्यानंतर तातडीने वाळंज यांना सोमाटणे येथिल पायनर रुग्णालयात हालविण्यात आले मात्र उपचारापुर्वीच डॉक्टरांनी वाळंज हे मृत झाले असल्याचे घोषित केले.
वाळंज यांच्यावर गोळीबार झाल्याची घटना मावळात वार्यासारखी फि रल्याने तालुक्यातील सर्व मनसे कार्यकर्त्यांनी कामशेतमध्ये मोठी गर्दी केली होती तसेच वाळंज यांचा मृतदेह कामशेत पोलीस स्थानकांच्या समोर रस्त्यावर ठेवत वाळंज यांच्या संतप्त नातेवाईकांनी आरोपींना तातडीने अटक करा या मागणीसाठी पोलीस स्थानकात गोंधळ घातला. यानंतर वाळंज यांची बहिण, भाऊ व अन्य नातेवाईकांनी पोलीस स्थानकातून बाहेर पडल्यानंतर माध्यमाच्या पतिनिधीना शिविगाळ व धक्काबुक्की करत मार्गातील वाहनांची तसेच दत्त कॉलनी येथिल तीन मतदान केंद्राची तोडफोड केली. पोलीसांनी येथील जमाव पांगविल्यानंतर संतप्त जमावाचा हा मोर्चा बाजारपेठेतून गोळीबार झालेल्या ठिकाणी जाऊन जिल्हा परिषद शाळेतील मतदान केंद्राची देखील तोडफोड करत त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या भाजपाचे ज्येष्ठ नेते माऊली शिंदे यांना मारहाण करण्यात आली.
कामशेतमध्ये शिंदे व वाळंज यांचे पूर्ववैमानस्य आहे. २००७ साली या दोन कुठुंबांमध्ये मोठी भांडणे झाली होती. त्यावेळी बंटी वाळंज यांनी शिंदे यांच्या घरातील  एका युवकाचा खून केला होता. याचा राग मनात धरुन शिंदे यांनी मतदानाच्या कालावधीत वाळंज यांचा खून केला असल्याचा दाट संशय आहे. घटनेनंतर कामशेत बाजारपेठ बंद ठेवण्यात आली होती. दरम्यान दुपारच्या सुमारास मतदान केंद्राची तोडफोड झाल्याने दुपारनंतर मतदान देखील बंद पडले होते. भीतीपोटी नागरिक घरातून बाहेर पडलेच नाहीत.
तणावग्रस्त वातावरण शांत करण्यासाठी पोलीस अधिक्षक जय जाधव, जिल्हाधिकारी सौरभ राव, पांत अधिकारी सुभाष बोरकर, उपविभागीय पोलीस अधिकारी विनायक ढाकणे यांनी कामशेत मध्ये येऊन वाळंज यांच्या नातेवाईकांना शांततेचे आव्हान करत आरोपींना तातडीने अटक करण्याचे आश्वासन दिल्यानंतर सायंकाळी ५ वाजता वाळंज यांचा मृतदेह ससून येथे शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. बुधवारी सकाळी ११ वाजता वाळंज यांच्या पाíथवावर अत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
बुधवारी मावळ बंदची हाक
मंगेश वाळंज यांच्या खुनाच्या घटनेचा निषेध नोंदविण्यासाठी मावळ तालुका मनसेच्या वतीने बुधवार दि ५ ऑगस्ट रोजी मावळ बंदची हाक देण्यात आली असून अत्यावश्यक सेवा वगळता सर्व नागरिकांनी या बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. मनसेचे जिल्हाध्यक्ष सुधीर पाटसकर यांनी ही माहिती दिली.

vinay kore marathi news, dhairaysheel mane marathi news
वारणा समूहाची विश्वासार्हता दाखवून देताना धैर्यशील मानेंना विजयी करा; जनसुराज्यशक्ती पक्षाचे संस्थापक आमदार विनय कोरे
Conservation Work, Kolhapur s Mahalakshmi Ambabai Idol, Original Idol Unavailable for Darshan, mahalakshmi ambabai darshan not 2 days, 14 to 15 april 2024, kolhapur mahalakshmi mandir, mahalakshmi ambabai,
रविवारपासून अंबाबाई देवीच्या मूर्तीचे संवर्धन; भाविकांना दर्शन पितळी उंबऱ्यापासून
Mahayuti gathering in Washim, Gyayak Patni,
महायुतीचा मेळावा : मंत्री व पालकमंत्री उपस्थित अन् खुर्चीवरून वाद !
Prime Minister Narendra Modi going to Address Public Meeting in Chandrapur
पंतप्रधान नरेंद्र मोदींची ८ एप्रिलला चंद्रपुरात सभा