19 December 2018

News Flash

निगडीत दहावीच्या विद्यार्थ्याची हत्या

प्रेमप्रकरणातून हत्या झाल्याचा संशय

वेदांत भोसले (१५) हा निगडीतील माता अमृता शाळेत दहावीत शिकत होता.

निगडीत १० वीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याची राहत्या घराजवळच हत्या केल्याची घटना समोर आली आहे. वेदांत भोसले (१५) असे या मृत्यू झालेल्या विद्यार्थ्याचे नाव असून प्रेमप्रकरणातूनच त्यांची हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

निगडीतील माता अमृता शाळेत दहावीमध्ये शिकणारा वेदांत सोमवारी रात्री अभ्यास केल्यानंतर मैत्रिणीला सोडायला गेला. तिथून परतत असताना अज्ञातांनी त्याच्यावर हल्ला केला. तीक्ष्ण हत्यारांनी त्याच्यावर वार करण्यात आले. यात  वेदांत गंभीर जखमी झाला. पूर्णानगर येथे वेदांत जखमी अवस्थेत पडल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वेदांतला रुग्णालयात नेले. मात्र रुग्णालयात उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. प्रेमप्रकरणातून ही घटना घडल्याचे सांगितले जाते. या प्रकरणी पोलिसांनी तपासाला सुरुवात केली.

निगडीत अल्पवयीन मुलावरील हल्ल्याची ही दुसरी घटना आहे. यापूर्वी सोमवारी सकाळी रुपेश गायकवाड या तरुणावर हल्ला झाला होता. अंगावर कागदाचा बोळा फेकण्याच्या क्षुल्लक वादातून हा हल्ला झाला होता.

 

First Published on March 13, 2018 10:10 am

Web Title: nigdi ssc student killed by unknown person love angle suspected