01 December 2020

News Flash

दत्ता फुगे खूनप्रकरणात नऊ आरोपींना अटक

फुगे यांना गुरुवारी रात्री नऊच्या सुमारास वाढदिवसाचे कारण सांगून काहींनी घरातून नेले होते.

सात जणांना सहा दिवसांची पोलीस कोठडी
सोन्याच्या शर्ट शिवल्याने प्रसिद्धीच्या झोतात असलेल्या गोल्डमॅन दत्ता फुगे यांच्या खूनप्रकरणी पोलिसांनी मुख्य सूत्रधारासह एकूण नऊ आरोपींना अटक केली आहे. त्यातील सात जणांना २१ जुलैपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. फुगे यांचा गुरुवारी मध्यरात्री दिघीच्या भारतनगर भागात दगडाने ठेचून खून करण्यात आला होता.
खून प्रकरणातील मुख्य सूत्रधार अतुल अमृत मोहिते (वय २५) याच्यासह शौकत मुनीर आत्तार (वय २४), सुशांत जालिंदर पवार (वय २०), तुषार कान्हू जाधव (वय २०, सर्व रा. भारतमातानगर, दिघी), अतुल ऊर्फ बल्ली कैलास पठारे (वय २४, रा. म्हस्के वस्ती, आळंदी रस्ता), शैलेश सूर्यकांत वाळके (वय २६, रा. यमाईनगर, दिघी), विशाल दत्ता पारखे (वय ३२, रा. विश्रांतवाडी), निवृत्त ऊर्फ बाळू किसन वाळके (वय ४५, रा. विठ्ठल मंदिराजवळ दिघी), प्रेम ऊर्फ कक्का ऊर्फ प्रमोद संताराम ढोलपुरीया (वय २३, रा. रामनगर, बोपखेल) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
फुगे यांचा मुलगा शुभम (वय २१, रा. भोसरी) याने याबाबत फिर्याद दिली आहे. फुगे यांना गुरुवारी रात्री नऊच्या सुमारास वाढदिवसाचे कारण सांगून काहींनी घरातून नेले होते.
त्यानंतर बाराच्या सुमारास भारतमातानगर येथे त्यांच्यावर कोयत्याने वार करण्यात आले, तर डोक्यात दगड घालून त्यांचा खून करण्यात आला. या प्रकरणात पाच आरोपींना पोलिसांनी तातडीने ताब्यात घेतले होते.
शुक्रवारी रात्री इतर आरोपींना अटक करण्यात आली. त्यांना दुपारी न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाच्या परिसरात मोठी गर्दी झाली होती. न्यायालयाने पोलिसांची मागणी ग्राह्य़ धरून आरोपींची रवानगी पोलीस कोठडीत केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 17, 2016 2:56 am

Web Title: nine suspects arrested in murder of gold man dattatray phuge
Next Stories
1 महापौरांचा आदेश, आयुक्तांचा नकार
2 अंतिम पदवी देण्यापूर्वीच पीएच.डी. प्रबंध पाहण्यासाठी उपलब्ध करून देणे आवश्यक
3 फुड प्रोसेसरऐवजी ग्राहकाला रिकामे खोके; सदोष सेवेबद्दल ‘आस्क मी बझार’ला ग्राहक मंचाचा दणका
Just Now!
X