पुणे शहरामध्ये वाहनांची वाढती संख्या वाहन क्रमांकाच्या नव्या मालिकांवरून स्पष्ट होत असून, अवघ्या महिन्याभरातच आरटीओकडून दुचाकीच्या नव्या क्रमांकाची मालिका जाहीर करण्यात आली आहे. या मालिकेतील आकर्षक क्रमांक हवे असणाऱ्यांना अर्ज करण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.
दुचाकीसाठी ‘एमएच १२ एनडी’ ही नवी मालिका सुरू होणार आहे. त्यातील आकर्षक व पसंतीचे क्रमांक हवे असल्यास ८ जूनला सकाळी अकरा ते दुपारी अडीच या वेळेत अर्ज मागविण्यात आले आहेत. अर्जदारांची यादी ९ जूनला कार्यालयातील फलकावर लावण्यात येणार असून, एकाच क्रमांकासाठी एकाहून अधिक अर्ज आल्यास त्याच दिवशी दुपारी या क्रमांकाचा लिलाव करण्यात येईल. सर्वाधिक रकमेचा डीडी बंद लिफाफ्यातून देणाऱ्याला संबंधित क्रमांक देण्यात येईल. दुचाकीचे आकर्षक क्रमांक चारचाकी वाहनांना हवे असल्यास त्यासाठी ६ जूनला कार्यालयीन वेळेत अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत.त्याची यादी ७ जूनला फलकावर लावली जाईल व त्याच दिवशी लिलावाची प्रक्रियाही करण्यात येईल, असे प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांकडून कळविण्यात आले आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on June 4, 2016 3:34 am