News Flash

औट घटके ची स्वच्छता

स्वच्छ सर्वेक्षणासाठी सार्वजनिक स्वच्छतागृहांमध्ये सुविधांचा देखावा

स्वच्छ सर्वेक्षणासाठी सार्वजनिक स्वच्छतागृहांमध्ये सुविधांचा देखावा

पुणे : येरवडय़ातील एका स्वच्छतागृहातील अनेक सोयी-सुविधा पाहून त्या दिवशी तेथे जाणारे सारेच नागरिक अंचबित होत होते. स्वच्छतागृहाला झालेली आकर्षक रंगरंगोटी तसेच तेथे कधीही न मिळणाऱ्या आरसा, टॉवेल, टूथपेस्ट, र्निजतुकीकरणाचे द्रावण आदी अनेक सुविधा अचानक आल्यामुळे साऱ्यांनाच आश्चर्य वाटत होते. मात्र हा देखावा काही तासच पाहायला मिळाला आणि नंतर मात्र स्वच्छतागृहाने मूळ रूप धारण के ले. त्याला निमित्त ठरले ते स्वच्छ सर्वेक्षणाचे आणि स्वच्छ सर्वेक्षणाअंतर्गत महापालिका कागदोपत्री निकषांची पूर्तता कशी करते, हे यातून स्पष्ट झाले.

स्वच्छ सर्वेक्षणाअंतर्गत महापालिका गेल्या काही वर्षांपासून सातत्याने सहभाग नोंदवित आहे. या अंतर्गत के ंद्राचे एक पथक शहरातील सार्वजनिक स्वच्छतागृहांची परिस्थिती, घनकचरा व्यवस्थापन आदी बाबतचा आढावा घेते. यंदाही असे एक पथक शहरात दाखल झाले आहे. के ंद्रीय पथकाने दिलेल्या गुणांवर महापालिके चे मानाकं न ठरणार आहे. त्यानुसार महापालिके ची स्वच्छ सर्वेक्षणासाठी धावाधाव सुरू झाली आहे.

सर्वेक्षणासाठी महापालिके ने शहरातील १ हजार २२४ स्वच्छतागृहांत विविध प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या असल्याचा दावा महापालिके ने केला असून त्यांना सर्वोत्तम स्वच्छतागृहे असा दर्जा दिला आहे. यातील दोन स्वच्छतागृहे येरवडा प्रभागातील आहेत.

येरवडय़ातील या स्वच्छतागृहांची पाहणी करण्यासाठी के ंद्रीय पथक येणार असल्याचे महापालिका अधिकाऱ्यांच्या लक्षात आल्यानंतर तत्परतेने आरसा, टॉवेल, र्निजतुकीकरण द्रावण, टूथपेस्ट अशा वस्तू तातडीने स्वच्छतागृहाच्या दर्शनी भागात लावण्यात आल्या. वस्तू लावण्याचे काम पथक यायची वेळ झाली, तरी पूर्ण होत नसल्याचे लक्षात आल्यानंतर या पथकाला दुसऱ्या स्वच्छतागृहाची पाहणी करण्यासाठी नेण्यात आले. या कालावधीत पहिल्या स्वच्छतागृहात सर्व वस्तूंची नीट रचना करण्यात आली. मात्र पथक या स्वच्छतागृहाची पाहणी करण्यासाठी संध्याकाळपर्यंत फिरकले नाही. हे लक्षात आल्यानंतर सर्व वस्तू महापालिका अधिकाऱ्यांनी काढून घेतल्या आणि त्यांची रवानगी दुसऱ्या ठिकाणी के ली. या प्रकारामुळे महापालिके ची दिखावू कामगिरीही अधोरेखीत झाली.

निकषांची कागदोपत्री पूर्तता

स्वच्छ सर्वेक्षणातील निकषांची महापालिका कागदोपत्री पूर्तता करत असल्याचे आरोप सातत्याने होत आहेत. शहराच्या अनेक भागात सार्वजनिक स्वच्छतागृहांची मोठी कमतरता आहे. पुरुषांच्या तुलनेत महिलांसाठीची स्वच्छतागृहे तर खूपच अपुरी आहेत. शहरातील स्वच्छतागृहे पाडली जात असून नव्या स्वच्छतागृहांची उभारणी होतच नसल्याचे वास्तव आहे. ज्या भागात स्वच्छतागृहे आहेत, त्यांची दुरवस्था झाली असून सार्वजनिक स्वच्छतागृहांबाबतचे धोरणही कागदावरच राहिले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 25, 2021 12:25 am

Web Title: only show off about facilities in public toilets for clean survey zws 70
Next Stories
1 लोकजागर : पानी रे पानी, तेरा रंग कैसा?
2 मिळकतकरातून १ हजार ५१५ कोटींचे उत्पन्न
3 कोशांमधील माहितीशोध सोपा करण्यासाठी ‘कोश’
Just Now!
X