28 February 2021

News Flash

पिंपरी-चिंचवड : सशस्त्र टोळक्याचा शहरात धुडगूस; तरुणावर वार करीत वाहनांची तोडफोड

तलवार आणि कोयते घेऊन कार फोडल्या

पिंपरी : शहरात एका सशस्त्र टोळक्याने केलेली गाड्यांची तोडफोड.

पिंपरी-चिंचवड शहरात रविवारी रात्री उशीरा एक थरारक घटना घडली. पूर्ववैमनस्यातून १२ जणांच्या टोळक्याने एका तरुणावर हल्ला चढवला. तसेच दहशत माजवण्यासाठी त्यांनी परिसरातील काही कारची तोडफोडही केली. यात फिर्यादीसह चार जण जखमी झाले आहेत. या प्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेतील आरोपींना गुन्हे शाखा युनिट-४ कडून अटक करण्यात आली आहे. यात काही अल्पवयीन मुलांचा सहभाग आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, या प्रकरणी हल्ला झालेला जखमी तरुण राजकुमार आरसन पिल्ले (वय २५) याने फिर्याद दिली आहे. या घटनेत इतर तरुण संतोष सिद्धेश्वर चौधरी, चेतन गणेश जवरे, अजय भरत कांबळे हे देखील जखमी झाले आहेत. तर चेतन अहिरे आणि समीर शेख (रा. कस्तुरबा गांधी झोपडपट्टी, औंध) अशी आरोपींची नावे असून त्यांच्यासह इतर १२ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, शहरातील पिंपळे निलख परिसरात फिर्यादी राजकुमार पिल्ले हा तरुण त्यांच्या मित्रांसह खंडोबामाळ मंदिर या परिसरातून घरी जात होता. तेव्हा, अचानक १२ जणांच्या टोळक्याने तलवारी आणि कोयत्याने त्यांच्यावर हल्ला चढवला. यामध्ये राजकुमारच्या डोक्यात आणि पायावर वार करण्यात आले. यावेळी त्याच्यासोबत असलेल्या मित्रांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न करताना त्यांनाही बेदम मारहाण करण्यात आली.

दरम्यान, मारहाण केल्यानंतर या १२ जणांच्या टोळक्याने दहशत निर्माण करण्यासाठी रस्त्याच्या कडेला पार्क करण्यात आलेल्या ७ चारचाकी वाहनांची तलवारी आणि कोयत्याने तोडफोड केली. सांगवी पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 15, 2020 4:28 pm

Web Title: pimpri chinchwad armed gangs roam the city vehicle vandalism attacking youth aau 85 kjp 91
Next Stories
1 शरद पवारांच्या कामाचा वेग प्रचंड, त्यांना मानलंच पाहिजे- चंद्रकांत पाटील
2 ‘कळत नकळत’चे दिग्दर्शक कांचन नायक यांचं निधन
3 पुणेकर लय भारी.. नववीत शिकणाऱ्या मुलानं तयार केला वॉर बॉट रोबोट
Just Now!
X