News Flash

पुण्यातील रस्त्यांवर पुन्हा एकदा पाणीच पाणी

जलकेंद्राच्या टाक्या ओव्हरफ्लो झाल्याचे वृत्त असून यामुळे परिसरातील आठ ते दहा घरांमध्ये पाणी शिरले आहे

पू. ल देशपांडे उद्यानाच्या समोर हे पाणी रस्त्यावर आले. त्यामुळे वाहनचालकांची चांगलीच कसरत झाली.

बेसुमार पाणी वापरणाऱ्या पुणे महापालिकेला जलसंपदा विभागाने दणका दिला असतानाच दुसरीकडे प्रशासनाच्या निष्काळजी कारभारामुळे पुण्यातील सिंहगड रस्ता, नवशा मारुती-चुनाभट्टीजवळील परिसर जलमय झाला आहे. जलकेंद्राच्या टाक्या ओव्हरफ्लो झाल्याचे वृत्त असून यामुळे परिसरातील आठ ते दहा घरांमध्ये पाणी शिरले आहे.

कालवा सल्लागार समिती, जलसंपदा विभाग आणि महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाच्या आदेशाला केराची टोपली दाखवत बेसुमार पाणी वापरणाऱ्या महापालिकेला जलसंपदा विभागाने तिसऱ्यांदा दणका दिला आहे. पर्वती जलकेंद्राला पाणी पुरवठा करणारे महापालिकेचे दोन पंप बुधवारी दुपारी तीन वाजता जलसंपदा विभागाकडून बंद करण्यात आले होते. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी सकाळी पर्वती जलशुद्धीकरण केंद्रातील रॉ- वॉटर व्हॉल्व्ह नादुरुस्त झाल्याने लाखो लिटर पाणी वाया गेले. तब्बल 2 तास हे पाणी वाहत होते. या बिघाडामुळे परिसरातील काही भागांमधील रस्त्यावर चार फूट पाणी साचले होते.

गुरुवारी पाणी पुरवठा बंद असल्याने सकाळी महापालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून खडकवासला ते पर्वतीपर्यंत येणाऱ्या सुमारे 1600 मीमी व्यासाच्या जलवाहिनीचा व्हॉल्व बंद करण्यात येत होता. मात्र, त्यात अचानक बिघाड झाल्याने लाखो लिटर पाणी रस्त्यावर आले. पू. ल देशपांडे उद्यानाच्या समोर हे पाणी रस्त्यावर आले. त्यामुळे वाहनचालकांची चांगलीच कसरत झाली.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 17, 2019 8:56 am

Web Title: pmc water tank overflow flood like situation sinhagad road navshya maruti area
Next Stories
1 प्रेमास नकार देणाऱ्या युवतीवर हल्ला करणाऱ्यास पकडले
2 चरित्रपट ही जबाबदारीने करण्याची गोष्ट
3 शास्तीकराच्या घोषणेनंतर पिंपरीत भाजपविरुद्ध सर्वपक्षीय एकवटले
Just Now!
X