पुणे सोलापूर रोडवरील कदम वाक वस्ती ग्रामपंचायत समोर एर्टिगा या चारचाकी गाडीचा आणि ट्रकचा अपघात झाल्याने नऊ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. या अपघातात  स्क्रॅपच्या दुकानात काम करणारा जुबेर अजिज मुलाणी याचा अपघातामध्ये मृत्यू झाला असून तो
कॉमर्सच्या दुसर्‍या वर्षात शिक्षण घेत होता. जुबेरला b.com झाल्यावर सीए व्हायचं होतं. ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी तो स्क्रॅपच्या दुकानात काम करत होता, असं स्क्रॅप दुकानाचे मालक फिरोज शेख यांनी सांगितलं.

स्क्रॅप दुकानाचे मालक फिरोज शेख म्हणाले की, जुबेरचे वडील माझ्या स्क्रॅपच्या गाडीवर कामाला आहेत. तर त्यांचा मुलगा जुबेर हा sy bcom ला असल्याने त्याला मी दुकानाच्या बँकेचे व्यवहार पाहण्याच्या कामाला ठेवले होते. तो कामात अत्यंत हुशार होता. कामावर घेताना मी विचारलं होतं.. काय व्हायचं तुला तर तो बोलला काका मला सीए व्हायच आहे. त्याने कामाचे आणि कॉलेजच्या वेळाचे नियोजनही चांगले केले होते.  जुबेरची शिक्षणाची धडपड पाहून मी त्याला आठवड्यातून दोन दिवस कामाला सुट्टी दिली होती. माझ्या दुकानाचे व्यवहार चांगल्या पद्धतीने तो सांभाळत होता. मी त्याला कामगार केव्हा मानले नाही. मुलाप्रमाणे मानले हे सांगताना फिरोज शेख यांना अश्रू अनावर झाले होते.

पुणे सोलापूर रोड झालेल्या अपघातामधील मृतांची नावं
अक्षय भारत वाईकर, विशाल सुभाष यादव, निखिल चंद्रकांत वाबळे, सोनू ऊर्फ नूर मोहम्मद अब्बास दाया, परवेज अश्पाक अत्तार, शुभम रामदास भिसे, अक्षय चंद्रकांत घिगे, दत्ता गणेश यादव आणि जुबेर अजिज मुलाणी