06 December 2020

News Flash

पुण्यातील धक्कादायक प्रकार, नेपाळी तरुणीचं सात महिन्यांपासून लष्करी अधिकाऱ्यांच्या क्वार्टरमध्ये वास्तव्य

भोसरी पोलिसांकडून अटक

संग्रहित फोटो

पुणे सीएमईमध्ये एक नेपाळी तरुणी गेल्या सहा ते सात महिन्यांपासून राहात असल्याची गंभीर घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी भोसरी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून तरुणीला अटक केली आहे. एलिसा (२६) असं अटक करण्यात आलेल्या तरुणीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्यातील सीएमईमध्ये २३ मार्च रोजी नेपाळी तरुणी एलिसाने मॅकडोनाल्ड शॉप फुगेवाडी येथून भिंतीवरून उडी मारून लष्करी रहदारी असलेल्या सीएमईमध्ये अनधिकृतपणे प्रवेश केल्याच उघड झालं आहे. नेपाळी तरुणी लष्करातील सरकारी अधिकाऱ्यांच्या क्वार्टर्समध्ये राहत असल्याचं पोलीस तक्रारीत सांगण्यात आलं आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक संजय आनंदराव काळे यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून एलिसाला अटक केली आहे. लष्कराच्या मालमत्तेस आणि लष्कराच्या अधिकारी, जवानांच्या जीवितास धोका निर्माण करण्यासाठी तेथे राहात असल्याच्या संशयावरून गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

ही नेपाळी तरुणी दुबईवरून मलेशिया, नेपाळ आणि त्यानंतर मुंबईमध्ये आली असल्याचं विश्वासनीय सूत्रांनी सांगितलं आहे. तसेच पुण्यामध्ये एका मित्राकडे राहत होती. त्यानंतर तिने दापोडी सीएमई जिथे लष्कर अधिकारी, कर्मचारी राहतात त्या ठिकाणी अनधिकृतपणे गेली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 10, 2020 5:10 pm

Web Title: pune bhosari police has arrested nepali girl for unauthrised entry in cme kjp 91 sgy 87
Next Stories
1 हायपरलूप प्रवासाची पहिली यशस्वी मानवी चाचणी
2 किल्ल्यांच्या तयार प्रतिकृती, चित्रांच्या खरेदीसाठी गर्दी
3 योगाभ्यास वर्ग सुरू करण्यास परवानगी
Just Now!
X