News Flash

‘बाजीराव मस्तानी’ प्रदर्शित केल्यास नुकसानीची जबाबदारी स्वीकारावी

चित्रपटगृह संचालकांनी जनभावनेचा आदर करावा, अन्यथा होणाऱ्या नुकसानीची जबाबदारी स्वीकारावी, असे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

बाजीराव-मस्तानी चित्रपटाला भाजपचा विरोध

बहुचर्चित ‘बाजीराव मस्तानी’ चित्रपट प्रदर्शित केल्यानंतर होणाऱ्या नुकसानीची जबाबदारी चित्रपटगृहचालकांनी स्वीकारावी, असा इशारा भारतीय जनता पक्षाच्या कोथरूड विभागातर्फे गुरुवारी देण्यात आला.
शुक्रवारी (१८ डिसेंबर)‘बाजीराव मस्तानी’ हा चित्रपट प्रदर्शित करू नये, या संदर्भात भाजप कोथरूड विभागातर्फे सिटी प्राईडचे संचालक चाफळकर यांना निवेदन देण्यात आले. मराठा साम्राज्याचे शिल्पकार थोरले बाजीराव पेशवे हे मराठी अस्मितेचे प्रतीक आहेत. भारतीय इतिहासाचे विकृतीकरण केलेला हा चित्रपट प्रदíशत करू नये, अशी विनंती या वेळी करण्यात आली. या चित्रपटामुळे मराठय़ांच्या इतिहासाचे विकृत प्रदर्शन होत असतानाच आपल्या श्रद्धास्थानांची बदनामी होत असल्याची भावना वाढीस लागत आहे. याची दखल घेऊन चित्रपटगृह संचालकांनी जनभावनेचा आदर करावा, अन्यथा होणाऱ्या नुकसानीची जबाबदारी स्वीकारावी, असे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे. भाजप आणि युवा मोर्चाचे पदाधिकारी-कार्यकत्रे या वेळी उपस्थित होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 18, 2015 3:29 am

Web Title: pune bjp warns regarding bajirao mastani movie
टॅग : Bajirao Mastani
Next Stories
1 मनोरुग्णालयात राहणार; पण समाजात नोकरी करणार!
2 ‘पुलोत्सव’ तपपूर्ती सोहळ्याचे उद्घाटन
3 – सजग तरुणाचा नियमावर बोट ठेवत बँकेविरुद्ध लढा
Just Now!
X