पुणे महानगरपालिकेच्या २०१७-१८ च्या अंदाजपत्रकात असमान निधी दिल्याने नाराज झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी दाखल केलेली याचिका दिवाणी न्यायालयाने फेटाळून लावली आहे. महापालिकेने सादर केलेल्या बजेटला स्थगिती देण्यास न्यायालयाने नकार दिला आहे.

पुणे महापालिकेचे आगामी वर्षाचे ५ हजार ९१२ कोटींचे अर्थसंकल्प स्थायी समिती अध्यक्ष मुरूलीधर मोहोळ यांनी सर्वसाधारण सभेपुढे सादर केले होते. त्यावर विरोधी पक्षातील नगरसेवकांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. या अर्थसंकल्पाविरोधात राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे नगरसेवक भैयासाहेब जाधव,महेंद्र पठारे,योगेश जाधव यांनी धाव घेऊन याचिका दाखल केली होती. त्यावर दोन दिवस सुनावणी घेण्यात आली.

Vijay Wadettiwar on Mumbai 26/11 case
विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपा आक्रमक, निवडणूक आयोगाकडे केली तक्रार; म्हणाले, “अशा आरोपांमुळे…”
congress office vandalised
VIDEO : काँग्रेसच्या अमेठीतील कार्यालयावर हल्ला, वाहनांची केली तोडफोड; अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल
congress
सांगलीत मैत्रीपूर्ण लढत की माघार ? दिल्लीच्या निर्णयाची काँग्रेस नेत्यांना प्रतीक्षा
Sanjay Singh accused of making offensive remarks about Prime Minister Modi educational qualifications
संजय सिंह यांची याचिका फेटाळली; पंतप्रधान मोदी यांच्या पदवीबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी केल्याचा आरोप

अर्थसंकल्पाला स्थगिती द्यावी असा अर्ज दाखल करण्यात आला होता. न्यायालयाचा आदेश येईपर्यंत अंदाजपत्रकातील निधीच्या खर्चास मान्यता देऊ नये, असे याचिकाकर्त्यांकडून न्यायालयासमोर सांगण्यात आले होते. गुरुवारी झालेल्या सुनावणीत न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली आहे. त्यामुळे सत्ताधाऱ्यांना काही अंशी दिलासा मिळाला आहे.