26 February 2020

News Flash

पुणे : हडपसरमध्ये प्लॅस्टिकच्या गोदामाला भीषण आग

मध्यरात्री 2 वाजण्याच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली

पुण्यातील हडपसर येथे एका प्लॅस्टिकच्या गोदामाला आग लागल्याची घटना घडली आहे. हांडेवाडी होळकरवाडी रस्त्यावर असलेल्या प्लॅस्टिकच्या गोदामाला ही आग लागली होती. आगीवर नियंत्रण मिळविण्यात अग्निशमन दलास यश आले आहे.

हडपसर येथील हांडेवाडी होळकरवाडी रस्त्यावर असलेल्या प्लॅस्टिकच्या गोदामाला मध्यरात्री 2 वाजण्याच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली. या घटनेची माहिती मिळताच अग्नीशमन विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी काही वेळामध्ये घटनास्थळी धाव घेतली. पण तोपर्यंत आगीने रौद्ररूप धारण केले होते. यामध्ये गोदामातील सर्व साहित्य जळून खाक झाले. पण, काही वेळाने आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले. आग लागण्याचं नेमकं कारण अद्याप अजून समजू शकलेलं नाही, आगीच्या कारणाचा शोध घेतला जात आहे अशी माहिती अग्निशमन दलाकडून देण्यात आली आहे.

First Published on August 25, 2019 11:07 am

Web Title: pune hadapsar plastic godown catches fire sas 89
Next Stories
1 पुणे : मारुती सुझुकीच्या गोदामाला भीषण आग, लाखो रुपयांचे नुकसान
2 सनदी लेखापाल आयपीसी परीक्षेचा निकाल जाहीर
3 पुणे: वाहनांची तोडफोड करणारे टोळके काही तासात पोलिसांनी केले जेरबंद
Just Now!
X