पुणे : पाच पक्ष बदलणारे अमोल कोल्हे हेच महागद्दार आहेत. अशी टीका महायुतीचे उमेदवार शिवाजी आढळराव पाटील यांनी केली आहे. ते पिंपरी- चिंचवडच्या भोसरीमध्ये जाहीर सभेत बोलत होते. भोसरीमध्ये आढळराव यांच्यासाठी प्रचारसभा आयोजित केली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवाजी आढळराव पाटील, महेश लांडगे यांच्यासह इतर नेते उपस्थित होते.

विरोधक अमोल कोल्हे यांना मतदारांनी गेल्या पंचवार्षिक ला दिल्लीत पाठवलं. कोल्हे पुन्हा शिरूर लोकसभा मतदारसंघात दिसले नाहीत. मी पराभूत होऊन देखील पाच वर्षांपासून मतदारसंघात फिरत आहेत. विकास कामे करत आहे. अस आढळराव म्हणाले.

Raj Thackeray Fatwa
राज ठाकरेंनी काढला फतवा! म्हणाले, “जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो भगिनींनो आणि मातांनो..”
raj thackeray
पुण्यातील सभेत राज ठाकरेंकडून अजित पवारांचं कौतुक; म्हणाले, “या माणसाने कधीही…”
amol kolhe, amol kolhe s demand for Police Security at pdcc Bank, amol kolhe s demand Rejected, Shivaji adhalrao patil, Shivaji adhalrao patil s credit union Branches, Shirur Constituency, lok sabha 2024, election news, amol kolhe news,
अमोल कोल्हेंची मागणी प्रशासनाने फेटाळली
maval lok sabha, sanjog waghere
“खरे गद्दार श्रीरंग बारणे; दोन वेळेस ज्या पक्षाने खासदार बनवले त्याला…”, संजोग वाघेरेंची टीका
yogendra yadav
“लोकसभेच्या निकालानंतर अजित पवार आणि एकनाथ शिंदे…”, योगेंद्र यादव यांचं मोठं विधान!
Devendra Fadnavis on Eknath Shinde
“एकनाथ शिंदेंना अपमानित करायचे नव्हते, म्हणून…”, ठाणे लोकसभेवरून देवेंद्र फडणवीस यांचं मोठं विधान
Arvind Kejriwal first reaction
तुरुंगातून बाहेर येताच अरविंद केजरीवालांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “हुकूमशाही…”
Ajit pawar and sharad pawar (1)
“माझ्या वडिलांना कोणत्या आजारावर उपचार करायला नेलं होतं?”, अजित पवारांचा शरद पवारांना थेट प्रश्न

हेही वाचा…“अजित पवारांनी कधीही जातीपातीचं राजकारण केलं नाही”; राज ठाकरेंनी केलं कौतुक; म्हणाले, “इतकी वर्ष ते…”

पुढे ते म्हणाले, कोल्हे यांना १५ – २० गावाच्या वेशीवर अडवलं. त्यांना नागरिकांनी जाब विचारला. तुम्ही आमच्यासाठी काय केलं. अशी विचारणा करण्यात आली. मतदारांनी कोल्हे यांना फोन केल्यानंतर त्यांचे पीए हे अमोल कोल्हे यांच्या आवाजात बोलतात. पुढे ते म्हणाले, अमोल कोल्हे यांनी आत्तापर्यंत पाच पक्ष बदलले आहेत. मनसे, शिवसेना, राष्ट्रवादी, अजित पवार आणि शरद पवार गट अशा बेडूक उद्या त्यांनी घेतल्या. कोल्हे हेच खरे महागद्दार आहेत. अशी टीका शिवाजी आढळराव यांनी केली आहे.