गेले २ दिवस पडत असलेल्या पावसाचा फटका संपूर्ण राज्याला बसताना दिसतो आहे. मुंबई आणि उपनगरांत पावसाची संततधार सुरु असून काल सकाळपासून सुरु झालेल्या पावसाचा जोर अद्यापही कायम आहे. ठाणे, रायगड, पेण या परिसरातही पावसाने थैमान घातले आहे. याशिवाय पिंपरी चिंचवड भागात अनेक ठिकाणी पाणी साठले असून जनजीवनावर परिणाम झाला आहे. पुण्यातील ताडीवाला रोड जवळील वसाहतीमध्ये पाणी शिरले आहे.

Mumbai, Water supply,
मुंबई : पूर्व उपनगरात गुरुवारी पाणीपुरवठा बंद; चेंबूर, गोवंडी, देवनारमध्ये पाणी नाही
Mumbai, water storage,
मुंबई : सातही धरणांमध्ये ५.६४ टक्के पाणीसाठा, धरणक्षेत्रात दमदार पावसाची प्रतीक्षा
pune heavy rainfall causes trees to fall
पहिल्याच पावसात पुणे ‘पाण्यात’ : मुसळधार पावसामुळे पंधरा ठिकाणी झाडे कोसळली, वाहतुकीची कोंडी
Solapur, Theft, jewellery shop,
सोलापूर : बुरखा परिधान करून सराफी दुकानात ‘हाथ की सफाई’; चार महिलांचा शोध
streets of mumbai empty today due to result of the lok sabha election
टीव्हीवर निकालांचा धुराळा, तर मुंबईतील रस्त्यांवर शुकशुकाट; मुंबईकरांचं मतमोजणीकडे लक्ष!
water supply remains closed for ten hours in kalyan dombivli city on 6 june
कल्याण डोंबिवली शहरांचा पाणी पुरवठा गुरूवारी दहा तास बंद
Akola, health, villagers,
अकोला : दूषित पाण्यामुळे ४९ ग्रामस्थांची प्रकृती बिघडली
trees, cement roads, Nagpur,
उपराजधानीत कोंडतोय झाडांचा श्वास; शेकडो हात…

तसेच, सततच्या पावसाचा फटका पुण्यातील येरवडा शांतीनगर भागाला बसला असून वसाहतीमध्ये पाणी शिरले आहे.

तशातच सततच्या पावसामुळे खडकवासला धरणातून सध्या अकरा वाजल्यापासून ३५ हजार ५७४ क्युसेक इतका पाण्याचा विसर्ग सुरू आहे. धरण क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस चालू असल्यामुळे पानशेत आणि वरसगाव धरणे शंभर टक्के भरली आहेत. दोन्ही धरणातून अनुक्रमे १२ हजार ९३६ आणि ९ हजार ०३५ असा विसर्ग सुरु आहे. तसेच पावसाचा जोर धरण क्षेत्रामध्ये वाढलेला पाहायला मिळत आहे. त्यामुळे दुपारी तीन वाजता खडकवासला धरणातून एकूण ४१ हजार ७५६ क्युसेक इतका विसर्ग मुठा नदीपात्रात सोडण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.