23 September 2020

News Flash

ज्येष्ठ साहित्यिक-संपादक प्रा. राम कोलारकर यांचे निधन

‘जागतिक लघुकथे’चे दोन खंड , विनोदी आणि ऐतिहासिक कथांचे ७० संग्रह अशी कोलारकर यांची ग्रंथसंपदा होती.

राम कोलारकर

पुणे : लघुकथेसाठी राज्य पुरस्कार लाभलेले साहित्यिक आणि संपादक प्रा. राम कोलारकर (वय ८५) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्यामागे दोन मुलगे, मुलगी आणि नातवंडे असा परिवार आहे. प्राचार्या मुक्तजा मठकरी या त्यांच्या कन्या,तर भारतीय जनता पक्षाचे माजी शहराध्यक्ष प्रा. विकास मठकरी हे त्यांचे जावई.

‘प्रा. राम कोलारकर हे लघुकथेचे कोलंबस आहेत’, असे गौरवोद्गार  साहित्यसम्राट आचार्य अत्रे यांनी काढले  होते. ‘सर्वोत्कृष्ट मराठी कथा’ या प्रकल्पाने एक ‘व्रती संपादक’ अशी त्यांची ओळख महाराष्ट्राला प्रस्थापित झाली होती. हंस प्रकाशन आणि विश्वमोहिनी प्रकाशनचे ते मुख्य संपादक होते. त्याच्या कारकिर्दीत अनेक साहित्यिकांना राज्य पुरस्कार मिळाले. त्यामुळे एक अत्यंत पारखी संपादक म्हणून त्यांना नावाजण्यात आले होते. ‘जागतिक लघुकथे’चे दोन खंड , विनोदी आणि ऐतिहासिक कथांचे ७० संग्रह अशी कोलारकर यांची ग्रंथसंपदा होती. इंग्रजी आणि मराठी साहित्याचे गाढे अभ्यासक म्हणून प्रसिद्ध असलेले कोलारकर मराठी भाषेतील पॉकेट बुक्सचे प्रणेते होते. त्यांना लघुकथेचा राज्य पुरस्कार आणि अन्य पुरस्कार मिळाले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 10, 2019 4:29 am

Web Title: senior literary editor professor ram kolarkar passed away zws 70
Next Stories
1 पुणे-मुंबई महामार्गावर आजपासून एमएसआरडीसी कडून टोल वसुली
2 उद्योगनगरीला वाढत्या गुन्हेगारीचा विळखा
3 महिला, बालकांवरील अत्याचार परिचितांकडून
Just Now!
X