15 October 2019

News Flash

राज्य राखीव पोलीस दलाच्या आवारात घरफोडी

खेडकर यांच्या निदर्शनास हा प्रकार आला. त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. सहायक पोलीस निरीक्षक ए. ई. शेटे तपास करत आहेत. 

पावणेसहा लाखांचा ऐवज लंपास

राज्य राखीव पोलीस दलाच्या (एसआरपीएफ) आवारात असलेल्या जवानाच्या घरातून पावणेसहा लाखांचा ऐवज चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली.

याबाबत अश्विनी खेडकर (वय २६, रा. राज्य राखीव पोलीस दल वसाहत, रामटेकडी) यांनी वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खेडकर माहेरी गेल्या होत्या.

त्यांच्या घरातील कपाट उचकटून चोरटय़ाने पावणेसहा लाखांचे दागिने लांबविले. खेडकर यांच्या निदर्शनास हा प्रकार आला. त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. सहायक पोलीस निरीक्षक ए. ई. शेटे तपास करत आहेत.

First Published on September 19, 2019 4:41 am

Web Title: srpf police compound burglary akp 94 2