टाटा मोटर्स या भारतातील सर्वांत मोठ्या व्यावसायिक वाहन उत्पादक कंपनीने आज पुणे जिल्हा परिषदेला ५१ टाटा विंगर रुग्णवाहिका सुपूर्द केल्या. या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते. ही ५१ टाटा विंगर रुग्णवाहिकांची डिलिव्हरी हा जिल्हा परिषदेने दिलेल्या एका मोठ्या ऑर्डरचा भाग आहे आणि कोविड-१९ रुग्णांना सहाय्य पुरवण्यासाठी या रुग्णवाहिका पुणे जिल्ह्यातील ग्रामपंचायतींकडे तैनात केल्या जाणार आहेत.

गव्हर्न्मेंट ई-मार्केटप्लेसखाली देण्यात आलेल्या कार्यादेशासाठी (ऑर्डर) बोली लावत टाटा मोटर्सने हा कार्यादेश प्राप्त केला. त्यानुसार तयार करण्यात आलेली ही वाहने एआयएस 125 पार्ट १नुसार रुग्णांसाठी खास डिझाइन करण्यात आली आहेत. जिल्हा परिषदेचे आणि टाटा मोटर्सचे अधिकारी हस्तांतर समारंभाला उपस्थित होते.

टाटा मोटर्सच्या एससीव्ही प्रोडक्ट लाइनचे उपाध्यक्ष श्री. विनय पाठक यावेळी म्हणाले, “टाटा विंगर प्लॅटफॉर्म हा खूपच वैविध्यपूर्ण आहे आणि अनेकविविध उपयोजनांसाठी अत्यंत अनुकूल आहे. हा देशातील सर्वांत यशस्वी रुग्णवाहिका प्लॅटफॉर्म्सपैकी एक आहे आणि आत्तापर्यंत हजारो जणांचे प्राण वाचवण्यात या प्लॅटफॉर्मने मदत केली आहे.