पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर ऊर्से टोल नाक्याजवळ भरधाव मोटार दुभाजकाला धडकून झालेल्या अपघातात तीन महिलांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात दोघे जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये दिक्षा म्हात्रे, प्रिती शर्मा, रंजना कडू या तिघींचा समावेश आहे. या सर्व महिला रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यात राहणाऱया आहेत. रविवारी रात्री बाराच्या सुमारास हा अपघात झाला. योगेश भोसले आणि सोनाली कमाले अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हे सर्वजण आपल्या खासगी मोटारीतून शिर्डीहून मुंबईच्या दिशेने निघाले होते. त्यावेळी हा अपघात झाला. अपघाताचे नेमके कारण अद्याप समजलेले नाही. याप्रकरणी तळेगाव पोलीस ठाण्यामध्ये अपघाताची नोंद करण्यात आली आहे.
(संग्रहित छायाचित्र)