25 January 2020

News Flash

पुण्यात ट्रकने दुचाकींना दिलेल्या धडकेत तिघांचा जागीच मृत्यू, दोघे जण गंभीर जखमी

घटनेत मृत्युमुखी पडलेल्या तिघांचा मृतदेह पौड येथील ग्रामीण रूग्णालयात पाठविण्यात आले आहे.

पुण्यातील लवळे फाटा येथील पिरंगुट घाट उतारावर ट्रकने दुचाकीना जोरदार धडक दिली. या घटनेत तीन जणांचा मृत्यू झाला असून दोन जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. नागेश अंकुश गव्हाणे वय 21, पूजा बंडू पाटील वय 17,वैष्णवी सुनील सोनवणे वय 20 या तिघांचा मृत्यू झाला. तर दोघे जण गंभीर जखमी झाले आहे.

 पोलिसानी दिलेल्या माहितीनुसार, पिरंगुट घाट उतारावर आज रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास रस्त्यावरून काही दुचाकी जात होत्या. तेवढ्यात मागून येणार्‍या एम एच 15 जी व्ही 9011 या ट्रकने जोरदार धडक दिली. या घटनेत नागेश अंकुश गव्हाणे वय 21, पूजा बंडू पाटील वय 17,वैष्णवी सुनील सोनवणे वय 20 या तिघांचा मृत्यू झाला. तर दोघे जण गंभीर जखमी झाले असून त्यांची नावे समजू शकली नाही. दोन दुचाकीना धडक देऊन पळून जाणाऱ्या ट्रक चालकास घोटावडे फाटा येथे वाहतूक पोलिस मयूर निंबाळकर आणि इतर नागरिकांनी पकडण्यात यश आले आहे. या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या तिघांचा मृतदेह पौड येथील ग्रामीण रूग्णालयात पाठविण्यात आले आहे. तर जखमींना पिरंगुट येथील एका खाजगी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तसेच धडक देणार्‍या आरोपी ट्रक चालकास ताब्यात घेण्यात आले असून त्याच्याकडे चौकशी करण्यात आहे. तर यातील मयत वैष्णवी सोनवणे ही एका कंपनीत कामाला होती आणि पूजा पाटील इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत होती. अशी प्राथमिक माहिती समोर येत असल्याचे सांगण्यात आले.

First Published on September 11, 2019 1:08 am

Web Title: truck accident two wheeler akp 94
Next Stories
1 पुणे : विसर्जन मिरवणुकीतील देखाव्यांच्या उंचीवर पुढील वर्षी मर्यादा येणार!
2 पुणे : गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी ८ हजार पोलीस सज्ज – पोलीस आयुक्त
3 लोणावळ्यात जखमी मित्राला सोडून पळाले मित्र, शिवदुर्गच्या टीमने वाचवले प्राण
Just Now!
X