आपल्यासाठी योग्य क्षेत्र कसे निवडायचे? हा दहावी किंवा बारावीच्या वर्षी सतावणारा प्रश्न, त्यातच परीक्षांचा, प्रवेश मिळेल का, निर्णय बरोबर असेल ना हा ताण आणि वेगवेगळ्या संधीची माहिती मिळवण्याची धडपड.. अशा वेगवेगळ्या मुद्दय़ांची उत्तरे मंगळवारी मिळणार आहेत. एसआरएम युनिव्हर्सिटी प्रस्तुत ‘लोकसत्ता मार्ग यशाचा’ हा उपक्रम आज होणार आहे.
करिअरची निवड करताना पडणाऱ्या विविध प्रश्नांची उत्तरे देणाऱ्या ‘लोकसत्ता मार्ग यशाचा’ या उपक्रमासाठी ‘रोबोमेट’ ही संस्था सहप्रायोजक आहे. या कार्यक्रमांत तज्ज्ञ विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. तीन सत्रात हा कार्यक्रम होणार आहे. कल चाचणी म्हणजे काय, ती कधी करावी, त्याच्या निष्कर्षांतून आपली वाट निश्चित कशी करावी अशा विविध मुद्दय़ांवर ज्ञान प्रबोधिनीच्या संशोधन केंद्राच्या नीलिमा आपटे मार्गदर्शन करणार आहेत. वेगवेगळ्या क्षेत्रातील संधी, त्याची प्रवेश प्रक्रिया, नवी क्षेत्र अशा विविध मुद्दय़ांवर प्रसिद्ध करीअर समुपदेशक विवेक वेलणकर मार्गदर्शन करणार आहेत. अगदी दहावी, बारावीच्या परीक्षांचा ताण, प्रवेश प्रक्रियेला सामोरे जाताना येणारा ताण, करीअरच्या निवडीनंतर त्या क्षेत्रातील आव्हानांना तोंड देताना येणाऱ्या ताणाचा सामना कसा करावा या विषयावर ज्येष्ठ मानसोपचार तज्ज्ञ डॉ. उल्हास लुकतुके संवाद साधणार आहेत.
‘लोकसत्ता मार्ग यशाचा’
कधी : मंगळवार (८ डिसेंबर), सायंकाळी ५ वाजता
कुठे : भरत नाटय़ मंदिर
प्रवेशिका कार्यक्रमाच्या ठिकाणी तासभर आधी मिळणार आहेत.

मार्गदर्शन कोणाचे ?
तुमचा कल ओळखा’ – नीलिमा आपटे
‘ताणाला सामोरे जाताना..’ – डॉ. उल्हास लुकतुके
‘शोध वेगळ्या वाटांचा’ – विवेक वेलणकर