24 February 2018

News Flash

पिंपरीत विजेचा धक्का बसून कामगाराचा मृत्यू

उपचारादरम्यान मृत्यू

पुणे | Updated: November 14, 2017 5:53 PM

छायाचित्र प्रतिकात्मक

पिंपरीमध्ये एका कामगाराचा शॉक लागून मृत्यू झाला आहे. मंगळवारी दुपारी १२ च्या सुमारास ही घटना घडली. सचिन अशोक गायकवाड असं या मयत इसमाचे नाव आहे. या प्रकरणी पिंपरी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सचिन अशोक गायकवाड ( वय ३५ रा.बौद्धनगर पिंपरी) हा पिंपरी येथील सुखवाणी सिटी वसाहतीत एका कार्यक्रमासाठी मांडव घालण्याचे काम करत होता. यासाठी खड्डा खोदत असताना नकळतपणे सचिनचा जवळच असणाऱ्या विद्युत रोहित्राला धक्का लागल्याने त्याला जोराचा विजेचा धक्का बसला. यात तो बेशुद्ध पडला. त्यानंतर त्याला तातडीने वायसीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

First Published on November 14, 2017 5:53 pm

Web Title: worker died due to electric shock pimpari
  1. No Comments.