शिक्षण मंडळातील शिक्षकांच्या गुणवत्तावाढीसाठी स्वतंत्र शिक्षक प्रबोधिनी स्थापन करण्याचा निर्णय प्रथमच घेण्यात आला असून प्रभात रस्ता परिसरातील सन डय़ू या इमारतीत ही प्रबोधिनी स्थापन करण्यात येणार आहे. शिक्षण मंडळाच्या अंदाजपत्रकात या प्रबोधिनीसाठी एक कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून मंडळाचा संशोधन विभाग व अन्य प्रकल्पही प्रबोधिनीच्या माध्यमातून चालवले जाणार आहेत.
शिक्षण मंडळाच्या अंदाजपत्रकात महापालिकेने केलेल्या चार विभागांमध्ये चार शिक्षक प्रबोधिनी स्थापन करण्याचा प्रस्ताव होता. त्यासाठीच्या काही जागाही सुचविण्यात आल्या होत्या. मात्र, आयुक्तांनी त्यांचे अंदाजपत्रक तयार करताना शिक्षक प्रबोधिनीचा हा प्रस्तावच रद्द केला होता. स्थायी समितीने मात्र चार स्वतंत्र प्रबोधिनींऐवजी मंडळातील सर्व शिक्षकांसाठी एकच शिक्षक प्रबोधिनी स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे.
मंडळाच्या ताब्यात आलेल्या प्रभात रस्ता परिसरातील सन डय़ू या इमारतीत ही प्रबोधिनी सुरू केली जाईल. या इमारतीचा वापर त्यामुळे योग्य पद्धतीने होईल तसेच या भागातील वातावरणही शांत आणि शिक्षक प्रबोधिनीसाठी अनुकूल असे आहे. त्यामुळे एकाच ठिकाणी प्रबोधिनी सुरू करण्याचा निर्णय घेतल्याचे स्थायी समितीचे अध्यक्ष विशाल तांबे यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत सांगितले. या प्रबोधिनीच्या माध्यमातून शिक्षण मंडळाचा संशोधन विभाग तसेच व्यवसाय मार्गदर्शन केंद्र, गुणवत्तावाढ आदी अनेकविध उपक्रम चालवण्याचे नियोजन असल्याचेही ते म्हणाले.

Neha Hiremath murder case to be transferred to CID
धारवाड हत्येचा तपास सीआयडीकडेच विशेष न्यायालय स्थापण्याची कर्नाटक मुख्यमंत्र्यांची घोषणा, मुस्लीम संघटनांकडून तीव्र निषेध
haryana school bus accident
हरियाणातील स्कूलबस अपघात प्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई; शाळेच्या मुख्यध्यापिकेसह तिघांना अटक
teacher built a democratic gudhi for Public awareness and to increase voter turnout
शिक्षकाने उभारली चक्क लोकशाही गुढी! मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी पती-पत्नीकडून जनजागृती
prashant bhushan
चार हजार कोटींच्या निवडणूक रोख्यांचा हिशेब नाही! प्रशांत भूषण यांचा दावा; एसआयटी चौकशीसाठी लवकरच याचिका