पुणे : पुणे, पिंपरी-चिंचवडसह जिल्ह्यात ऑक्टोबरमध्ये गृहखरेदीत तेजी दिसून आली. मागील महिन्यात १४ हजार ८९३ घरांची विक्री झाली असून, एकूण ११ हजार ८०८ कोटी रुपयांचे व्यवहार झाले. विशेष म्हणजे, मागील वर्षीच्या तुलनेत घरांच्या विक्रीत २७ टक्के वाढ नोंदविण्यात आली आहे.

नाइट फ्रँक इंडियाने पुणे, पिंपरी-चिंचवड आणि जिल्ह्यातील मालमत्ता क्षेत्राचा अहवाल गुरुवारी जाहीर केला. त्यानुसार ऑक्टोबर महिन्यात १४ हजार ९८३ घरांची विक्री झाली. मागील वर्षी ऑक्टोबर महिन्यात ११ हजार ८४२ घरांची विक्री झाली होती. यंदा ऑक्टोबरमध्ये सरकारला घरांच्या व्यवहारातून ४९५ कोटी रुपयांचे मुद्रांकशुल्क मिळाले आहे. यंदा ऑक्टोबरअखेरपर्यंत एक लाख २२ हजार ६१० घरांची विक्री झाली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत त्यात १० टक्के वाढ नोंदविण्यात आली आहे. यंदा घरांचे व्यवहार ९३ हजार २१९ कोटी रुपयांवर पोहोचले असून, त्यातून सरकारला एकूण चार हजार ३०६ कोटी रुपयांचे मुद्रांकशुल्क मिळाले आहे.

Jalgaon, Private Bus Overturns in jalgaon, Five Injured, five injured in Bus Overturns, Guardian Minister Gulabrao, Relief Efforts, Minister Gulabrao Patil Leads Relief Efforts,
जळगाव जिल्ह्यात खासगी बस उलटून पाच प्रवासी गंभीर; मंत्री गुलाबराव पाटील यांचे मदतकार्य
Decrease in water storage in dams compared to last year
नागपूर : गतवर्षीच्या तुलनेत धरणांतील जलसाठ्यात घट
gudi padwa in Nagpur
नागपुरात गुढीपाडव्याला सुमारे १५० बालकांचा जन्म, मुलींचा टक्का अधिक
Onion auction closed for 11 days in nashik
कांदा लिलाव ११ दिवसांपासून बंद; नाशिकमध्ये एक लाख क्विंटलची खरेदी-विक्री ठप्प

आणखी वाचा-महामेट्रो-महापालिका यांच्यातील वादात सिंहगड रस्त्यावरील उड्डाणपुलाचा खोळंबा!

ऑक्टोबरमध्ये परवडणाऱ्या घरांना सर्वाधिक मागणी दिसून आली. एकूण विक्रीत परवडणारी म्हणजेच २५ ते ५० लाख रुपये किंमत असलेल्या घरांचे प्रमाण सर्वाधिक ३५ टक्के आहे. त्या खालोखाल ५० लाख ते एक कोटी रुपये किंमत असलेल्या घरांचे प्रमाण ३२ टक्के असून, एक कोटी रुपयांपेक्षा अधिक किंमत असलेल्या घरांचे प्रमाण १२ टक्क्यांवर पोहोचले आहे. एकूण विक्रीमध्ये ५०० ते ८०० चौरस फुटांच्या घरांचे सर्वाधिक ४७ टक्के प्रमाण आहे, असे अहवालात नमूद करण्यात आले आहे.

सर्वाधिक ग्राहक ३० ते ४५ वयोगटातील

एकूण ग्राहकांपैकी ५३ टक्के हे ३० ते ४५ वयोगटातील आहेत. तिशीच्या आतील ग्राहकांचे प्रमाण २६ टक्के आहे. त्याच वेळी ४५ ते ६० वयोगटातील ग्राहकांचे प्रमाण १६ टक्के आहे, असे अहवालात नमूद करण्यात आले आहे.

पुण्यातील निवासी मालमत्ता क्षेत्राची आगेकूच सुरू आहे. परवडणाऱ्या घरांना मागणी दिसून येत आहे. याच वेळी ग्राहकांकडून मोठ्या घरांना पसंती देण्याचे प्रमाण वाढले आहे. अनेक पायाभूत सुविधा प्रकल्पांचे काम सुरू असल्याने गृहनिर्मिती क्षेत्रातील वाढ कायम राहील. -शिशिर बैजल, अध्यक्ष, नाइट फ्रँक इंडिया