प्रवेश घेताच सत्र परीक्षेला सामोरे जावे लागण्याची चिन्हे

students in 5th 8th failed in pune city
पाचवी,आठवीच्या अनुत्तीर्णांमध्ये शहरातील विद्यार्थ्यांचे प्रमाण जास्त
telangana suicides
तेलंगणात ११वी आणि १२वीचा निकाल जाहीर होताच काही तासांतच सात विद्यार्थ्यांची आत्महत्या
jee mains result 2024 marathi news
JEE Main Result 2024: जेईई मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर, ५६ विद्यार्थ्यांना १०० टक्के गुण, नागपूरच्या निलकृष्ण गजरेने मारली बाजी…
Telangana school attacked over saffron clothing row
विद्यार्थ्यांच्या भगव्या कपड्यांवर मुख्याध्यापकांचा आक्षेप; संतप्त जमावाकडून शाळेची तोडफोड, गुन्हा दाखल

अकरावीच्या रिक्त असलेल्या जागांसाठी विशेष प्रवेश फेऱ्या घेण्यात येत असून अजूनही प्रवेश न घेतलेल्या आणि महाविद्यालय बदलण्याच्या प्रयत्नात असलेल्या विद्यार्थ्यांचा पहिल्या सत्राचा अभ्यास बुडण्याचीच शक्यता निर्माण झाली आहे. पहिल्या विशेष फेरीतील १३ हजार जागांसाठी ७ हजार विद्यार्थ्यांनी अर्ज अंतिम केले असून या फेरीची गुणवत्ता यादी शुक्रवारी दुपारी जाहीर होणार आहे. मात्र, ही प्रक्रिया पूर्ण होऊन प्रवेश होईपर्यंत गणेशोत्सव येणार असल्याने महाविद्यालयांत प्रवेश करताच या विद्यार्थ्यांना थेट पहिल्या सत्र परीक्षेलाच सामोरे जावे लागण्याची चिन्हे आहेत.

महाविद्यालय बदलून मिळण्याची विद्यार्थ्यांकडून केली जाणारी मागणी आणि अनेक विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहिल्यामुळे पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये अकरावीसाठी विशेष प्रवेश फेऱ्यांचे आयोजन करण्यात आले आहे. तीन विशेष फेऱ्या घेण्यात येणार असून त्या ऑगस्ट अखेपर्यंत सुरू राहणार आहेत. त्यानंतर गणेशोत्सव आणि नंतर अवघ्या महिनाभरात पहिली सत्र परीक्षा सुरू होणार आहे. प्रवेशापासून वंचित असलेल्या विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम बुडू नये यासाठी केंद्रीय समितीने महाविद्यालयांना सूचना दिल्या आहेत. या विद्यार्थ्यांसाठीही तासिका घेण्यात येत आहेत. मात्र मोजक्याच महाविद्यालयात ही सुविधा उपलब्ध असल्यामुळे विद्यार्थ्यांचा ओघ या तासिकांकडे कमीच आहे. प्रवेश राहिलेल्या विद्यार्थ्यांची संख्या तुलनेने कमी असली तरीही या विद्यार्थ्यांचा बुडालेला अभ्यासक्रम आणि प्रात्यक्षिके कशी भरून काढायची असा प्रश्न शिक्षकांना पडला आहे.

विशेष फेऱ्यांपैकी पहिल्या फेरीमध्ये १३ हजार २३२ जागा उपलब्ध होत्या. त्यासाठी ७ हजार १९८ विद्यार्थ्यांनी अर्ज अंतिम केले आहेत. या विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादी शुक्रवारी (१२ ऑगस्ट) दुपारी २ वाजता जाहीर करण्यात येणार आहे. या यादीनुसार शुक्रवारी दुपारी २ ते सायंकाळी ५ आणि शनिवारी (१३ ऑगस्ट) सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत प्रवेश घ्यायचा आहे.

विशेष फेरीचे वेळापत्रक

  • पहिल्या विशेष फेरीची गुणवत्ता यादी – १२ ऑगस्ट, दुपारी २
  • पहिल्या फेरीतील प्रवेश – १२ ऑगस्ट दुपारी २ ते सायंकाळी ५ आणि १३ ऑगस्ट सकाळी १० ते सायंकाळी ५
  • दुसऱ्या फेरीसाठी रिक्त जागांचा तपशील – १६ ऑगस्ट सायं. ५
  • दुसऱ्या फेरीसाठी अर्ज भरण्याचा कालावधी – १८ ऑगस्ट सकाळी ११ वाजल्यापासून ते १९ ऑगस्ट सायंकाळी ५ वाजेपर्यंत ’ दुसऱ्या फेरीची गुणवत्ता यादी – २२ ऑगस्ट
  • गुणवत्ता यादीप्रमाणे प्रवेश – २२ व २३ ऑगस्ट सकाळी ११ ते ४