पुणे : अटीतटीच्या बारातमी लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी बारामतीच्या माळेगावमधून मतदान केले. पवार मतदानासाठी केंद्रावर आल्यावर कार्यकर्त्यांनी त्यांचे स्वागत केले. कार्यकर्त्यांशी संवाद साधल्यानंतर त्यांनी मतदानाचा हक्क बजाविला. पवार यांच्यासह त्यांच्या अन्य कुटुंबियांनीही मतदान केले.

हेही वाचा – बारामतीत पैसे वाटल्याचा, दमदाटी केल्याचा आरोप

हेही वाचा – मोहोळ, धंगेकर यांना दुसरी नोटीस; प्रचार खर्चातील तफावत वाढली

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

काही वर्षांपूर्वी शरद पवारांनी बीसीसीआयच्या निवडणुकीसाठी आपले मतदान केंद्र बारामतीमधून मुंबईमध्ये बदलून घेतले होते, मात्र यंदा निवडणूक अटीतटीची असल्याने पुन्हा बारामतीमध्ये मतदान करण्याचा निर्णय त्यांनी जाहीर केला होता. सन १९६७ पासून पवार बारामतीच्या रिमांड होम या ठिकाणी मतदानाचा हक्क बजावत होते. २०१४ पर्यंत ते पवार कुटुंबीयांसोबत रिमांड होम येथे मतदान करायचे. मात्र, पक्षात पडलेल्या फुटीनंतर शरद पवार यांनी पुन्हा बारामतीमध्ये मतदान करण्याचा निर्णय घेतला. माळेगावच्या जिल्हा परिषद शाळेत त्यांनी मतदान केले. पवार बारामती येथील गोविंदबाग या निवासस्थानी दिवसभर थांबणार असल्याचेही सांगण्यात आले.