भारतीय जनता पक्षाच्या शहर कार्यकारिणीची घोषणा शहराध्यक्ष अनिल शिरोळे यांनी बुधवारी केली. शहर सरचिटणीसपदावर सात, तर उपाध्यक्षपदावर एकवीस जणांची नियुक्ती करण्यात आली असून कार्यकारिणीत चौसष्ट जणांचा समावेश आहे. या कार्यकारिणीवर पक्षातील मुंडे समर्थकांची छाप असून या गटाने कार्यकारिणीतील विविध पदांवर बाजी मारली आहे.
पक्षसंघटनेत अनेक कार्यक्षम तसेच कार्यकारिणीवर काम करण्यासाठी इच्छुक असलेल्यांची संख्या मोठी असून पदांची संख्या मात्र थोडी आहे. त्यामुळे योग्य ती सांगड घालून कार्यकारिणी तयार करण्यात आल्याचे शिरोळे यांनी सांगितले.
सरचिटणीसपदावर रमेश काळे, मुरलीधर मोहोळ, राजेश पांडे, धीरज घाटे, बाबा मिसाळ, संदीप खर्डेखर आणि जगदीश मुळीक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर उपाध्यक्षपदी सुनील कांबळे, दिगंबर डवरी, दत्ता खाडे, मारुती (आबा) तुपे, महेश लडकत, मुकेश गवळी, गोपाळ चिंतल, योगेश टिळेकर, दीपक नागपुरे, अभय फडके, वर्षां तापकीर, शशिकला मेंगडे, हेमंत रासने, काशिनाथ शिंदे, राजाभाऊ शेंडगे, डॉ. भरत वैरागे, दिनेश नायकू, जयंत भावे, किशोर संघवी, डॉ. संदीप बुटाला आणि राहुल कोकाटे यांची नियुक्ती झाली आहे. शहर चिटणीसपदी एकोणीसजणांची नियुक्ती करण्यात आली असून कोषाध्यक्षपदी प्रा. श्रीपाद ढेकणे यांची नियुक्ती झाली आहे.
विविध मोर्चाचे/आघाडय़ांचे अध्यक्ष पुढीलप्रमाणे आहेत. युवा मोर्चा- गणेश घोष, सुशील मेंगडे (सरचिटणीस), महिला मोर्चा- मंगला डेरे, अनुसूचित जाती जमाती आघाडी- सुखदेव अडागळे, झोपडपट्टी आघाडी- जीवन माने, व्यापारी आघाडी- प्रवीण चोरबेले, ओबीसी आघाडी- मनिष साळुंखे, ख्रिश्चन आघाडी- फ्रान्सिस डेव्हिड, सिंधी समाज आघाडी- गंगाधर नागदेव. मतदार संघांचे अध्यक्ष पुढीलप्रमाणे आहेत. नरेंद्र (नाना) मोरे (शिवाजीनगर), जगन्नाथ कुलकर्णी (कोथरूड), महेंद्र गलांडे (वडगाव शेरी), जयप्रकाश पुरोहित (कॅन्टोन्मेंट), माऊली कुडले (हडपसर), अमर देशपांडे (खडकी कॅन्टोन्मेंट), संतोष इंदूरकर (पुणे  कॅन्टोन्मेंट).