पिंपरी : ६७ वर्षीय जेष्ठाकडून पाच वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार

आरोपी भाऊराव खरात याला पोलिसांनी अटक केली आहे

प्रतिनिधिक छायाचित्र

पिंपरी-चिंचवडमध्ये पाच वर्षीय चिमुकलीला चॉकलेटचे अमिश दाखवून ६७ वर्षीय जेष्ठ नागरिकाने लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.  या प्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात पीडित चिमुकलीच्या आजी ने फिर्याद दिली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाऊराव उर्फ आप्पा बळीराम खरात वय-६७ असे लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपी जेष्ठ नागरिकाचे नाव आहे. त्याला पिंपरी पोलिसांनी अटक केली आहे

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी दुपारी अडीच च्या सुमारास नेहरू नगर येथे इमारतीच्या चौथ्या मजल्यावर आरोपी भाऊराव उर्फ आप्पा बळीराम खरात वय-६७ वर्ष यांचं घरातच किराणा दुकान आहे. तिथे पाच वर्षीय चिमुकलीला चॉकलेट चे अमिश दाखवून तिच्याबरोबर लैंगिक चाळे केले. यावेळी आरोपी च्या घरात कोणी नव्हते अशी माहिती पिंपरी पोलिसांनी दिली आहे. दरम्यान, पाच वर्षीय चिमुकलीने काही तासांनी सदर घटना आजी पाशी बोलून दाखवली, त्यामुळे ही गंभीर घटना उघडकीस आली आहे. या घटने प्रकरणी आरोपी भाऊराव याला बेड्या ठोकल्या आहेत. घटनेचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक उत्कर्षा देशमुख या करत आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व पुणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: 67 year old man seducing five year girl in pimpri nck

Next Story
राष्ट्रवादीच्या पुणे शहराध्यक्षपदासाठी काकडे, निकम, पाटील यांची चर्चा
ताज्या बातम्या